IBPS Clerk 2019 recruitment online : इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) बँकेतील (Institute of Banking Personnel Selection) क्लर्क पदासाठी भरती (IBPS Clerk 2019 recruitment online) सुरु केली आहे. या भरतीबाबत अधिसूचना करण्यात आली. यानुसार यात देशभरातील 17 सरकारी बँकांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी 17 सप्टेंबर 2019 ते 9 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल. जवळपास 12 हजार 074 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
निवड प्रक्रिया
बँकेतील क्लर्क पदासाठी होणारी निवड प्रक्रिया (IBPS Clerk Recruitment 2019) ही तीन टप्प्यांमध्ये असेल. यासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरल्यानंतर पुढील संधी दिली जाईल.
‘या’ बँकांमध्ये भरती होणार
अर्ज करण्याची प्रक्रिया
आयबीपीएस या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदरावांना ऑनलाईन (IBPS Clerk Recruitment 2019) माध्यमाद्वारे अर्ज करता येणार आहे. यासाठी ibps.in या वेबसाईटवर उमेदवारांनी भेट द्या.
महत्त्वाच्या तारखा
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पदवीधर असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्याशाखेतून पदवीधर असल्यास आपण यात सहभागी होऊ शकता.
वयोमर्यादा
आयबीपीएसद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार, बँकामध्ये कर्ल्कपदाच्या नोकरीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचा जन्म 2 सप्टेंबर 1991 च्या पूर्वी झालेला असणे गरजेचे आहे.