नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या 67 हजारांच्या (ICMR Change The Rules) पुढं गेली आहे. मात्र, आता डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्याचं कारण म्हणजे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावलीत केलेला बदल. डिस्चार्ज संदर्भातले नियम बदलल्याने त्याचा तात्काळ परिणाम (ICMR Change The Rules) पाहायला मिळत आहे.
रविवारी देशात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1,668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातही रविवारी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत देशभरात 1,559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्णhttps://t.co/K5uIxX3KkB
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
नियम बदलल्यानं डिस्चार्जची संख्या कशी वाढली आणि नवे नियम काय?
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील खाटा आणि कोरोना टेस्ट किटची उपलब्धता लक्षात घेता अभ्यास करुन हा निर्णय घेतल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञही ICMR शी सहमत आहेत.
कोरोनाबाधितावर उपचार केल्यानंतर सौम्य लक्षणं असेल तर तो बरा होतो आणि अशा व्यक्तीमुळे संसर्ग होत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. सौम्य किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असल्यास टेस्ट न करताच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. ICMR ने सध्या उपलब्ध साधन सामग्रीच्या आधारे हा निर्णय घेतला असला, तरी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांनी विलगीकरणात राहून स्वत:च्या तब्येतीसंदर्भात अधिक लक्ष्य ठेवावं (ICMR Change The Rules) लागणार आहे.
संबंधित बातम्या :