मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौण बनेगा करोडपती’चा (KBC) 11 वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिला प्रश्न जनतेला विचारला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर देत तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन KBC मध्ये करु शकता. एका व्हिडीओच्या माध्यमातून बच्चन यांनी हा प्रश्न जनतेला विचारला आहे. सोनी टीव्हीच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमधील अमिताभ बच्चन यांचा पहिला प्रश्न
“संस्कृत भाषेतून निर्माण झालेल्या यापैकी कोणत्या नावाचा अर्थ ‘स्वागत करणे’ असा होतो?”
ए. नचिकेत
बी. अभिनंदन
सी. नरेंद्र
डी. महेंद्र
Ab aapke aur Hot Seat ke beech mein na hogi duri, kyunki shuru ho gaye hai iss saal ke #KBC Registrations. Yeh raha iss saal ke registrations ka pehla sawaal. Register karne ke liye download kariye @SonyLIV app. pic.twitter.com/QPkY0nRGls
— Sony TV (@SonyTV) May 1, 2019
“आता तुमच्या आणि हॉट सिटमध्ये अंतर राहणार नाही. कारण यावर्षीच्या केबीसी शोचे रजिस्ट्रेशन आता सुरु झाले आहे. यंदाच्या रजिस्ट्रेशनचा हा पहिला प्रश्न आहे. जर या प्रश्नeचे तुम्हाला योग्य उत्तर येत असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारे उत्तर देऊ शकता किंवा सोनी लिव्हच्या अॅपवरही उत्तर देऊ शकता”, असं सोनी टीव्हीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
एसएमएसद्वारे उत्तर द्या
एसएमएसद्वारे सहभाग घेण्यासाठी यूजर्सला आपल्या एसएमएसमध्ये KBC लिहावे लागेल आणि स्पेस देऊन तुमचे वय लिहावे लागेल. यानंतर एक स्पेस देऊन तुम्हाला परुष किंवा स्त्री असं लिहावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 25 वर्षाचे आहात, तर तुम्हाला KBC 25 M असं लिहावं लागेल आणि 509093 वर सेंड करावं लागेल.
अॅप्लिकेशनद्वारे प्रश्नाचे उत्तर
अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सोनी लिव्ह अॅप डाऊनलोड करावा लागेल. यामध्ये केबीसीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर योग्य उत्तर देऊन केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रात्री 9 वाजता उत्तर द्यावे लागणार
या प्रश्नाचे उत्तर आज (गुरुवारी) रात्री 9 वाजेपर्यंत द्यावे लागणार आहे. जर 9 नंतर तुम्ही योग्य उत्तर दिले, तर तुमचे उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्ही योग्य उत्तर दिले, तर भाग्यवान विजेता कौण बनेगा करोडपतीमधील हॉट सीटवर पोहचेल.