नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात इतर कशाहीपेक्षा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगभरात त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona 10 Interesting things). भारतात जनता कर्फ्यूच्या घोषणेमुळे अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.
4. दक्षिण कोरियात एकाच महिलेद्वारे तब्बल ५ हजार लोकांमध्ये कोरोचा विषाणू संक्रमित झाल्याचं बोललं जातंय. चौकशीअंती कोरियातल्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय. संबंधित महिला नियमितपणे एका चर्चमध्ये जात होती. त्याच चर्चमध्ये नंतर हजारो जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ही महिला जिथं-जिथं गेली, तिथंही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचं बोललं जात आहे.
5. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनला नकार दिल्यानंतर तिथल्या सिंध आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दुपारपर्यंत पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या वर गेलाय. कोरोनाबाधितांच्या पहिल्या पन्नास देशांच्या यादीतही पाकिस्तानचा समावेश झालाय. दरम्यान, भारतानंतर पाकिस्तानातही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
6. कोरोना व्हायरसच्या पहिल्या स्वदेशी प्रायव्हेट टेस्टिंग किटला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता खासगी लॅबमध्येही कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका किटद्वारे शंभर लोकांची तपासणी होऊ शकते. पुण्यातल्या मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशंस कंपनीला ही परवानगी दिली गेलीय. अशाप्रकारची परवानगी मिळालेली ही देशातील पहिलीच कंपनी आहे.
7. देशातलं सर्वोच्च न्यायालय अद्यापही सुरु आहे. मात्र अगदी मोजक्याच कोर्टरुममध्ये सुनावणी होतेय. 23 मार्चपासून अनेक खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे होणार आहे. दोन्ही बाजूचे वकील व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारेच आपली बाजू मांडणार आहेत. देशातंर्गत न्यायलयीन खटल्यांच्या इतिहासात
हे पहिल्यांदाच घडतंय
8. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक वर्ष 31 मार्चऐवजी 31 जून केलं गेलंय. एरव्ही मार्च एन्ड हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदा मार्च एन्डऐवजी जून एन्ड म्हणावं लागणार आहे. एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची पद्धत भारतात ब्रिटीशांनी आणली. अंदाजे 1860 सालापासून भारतात 31 मार्चनंतर नवीन आर्थिक वर्ष सुरु होतं.
9. आर्थिक वर्ष पुढं ढकललं गेल्यामुळे इनकम टॅक्स रिटर्नचीही मुदत 31 जूनपर्यंत केली गेलीय. कर भरणाऱ्यांना याआधीही अनेकदा मुदतवाढ दिली जाते. मात्र एकाचवेळी थेट 2 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
10. मागच्या 3 वर्षानंतर एटीएम शुल्क पहिल्यांदाच रद्द केला गेलाय. कोरोनामुळे पुढचे तीन महिने तुम्ही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले, तरी त्याचा चार्ज लागणार नाहीय. मुंबईत 1987 साली एचएसबीसी बँकेनं देशातलं पहिलं एटीएम चालू केलं होतं. त्यानंतरचे अनेक वर्ष एटीएमवर कोणताही शुल्क नव्हता. दरम्यान, याचबरोबर बँकांमध्ये झिरो बॅलन्स असेल, तरी दंड आकारला जाणार नाहीय.
संबंधित बातम्या:
कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी
‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी
संबंधित व्हिडीओ: