जगाची 62 टक्के जनता ऑनलाईन, 93 टक्के सोशल मिडियावाले

| Updated on: Dec 07, 2022 | 6:30 PM

सतत मोबाईलमध्ये झुकलेल्या माना पाहून भावी पिढीची पैदास माना झुकलेल्या स्थितीत होईल की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

जगाची 62 टक्के जनता ऑनलाईन, 93 टक्के सोशल मिडियावाले
data
Image Credit source: data
Follow us on

मुंबई : बघावे तेव्हा नातवापासून ते आजोबांपर्यंत स्मार्ट फोनमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. त्यामुळे एकाच घरात राहूनही कोणी संवाद साधत नसल्याने सोशल मिडीयाला दुषणे दिली जातात. एका अभ्यासानूसार एप्रिल 2022 संपलेल्या आर्थिक वर्षांत जगात 5000 कोटी लोक इंटरनेट पाहत होते. म्हणजे जगाच्या लोकसंख्यपैकी  62 टक्के लोक त्यावेळी ऑनलाइन होते.

इंटरनेटवर ऑनलाइन असलेल्या या लोकसंख्येपैकी 93 टक्के जनता सोशल मिडियावाली असल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे.

हल्लीची पिढी इंटरनेटवर इतकी बिझी असते की मैदानी खेळ खेळण्याकडे कोणाला फारसी रुची दिसत नाही. त्यामुळे एकाच घरात डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले कु़टुंबिय ‘चपाती वाढ असे सांगण्यासाठी देखील व्हॉट्सअपवर संदेश पाठवतील की काय ? अशी परिस्थिती आहे.

एप्रिल 2022 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात इंन्स्टाग्रामवर 66 हजार फोटो तर फेसबुकवर 17 लाख कंटेट शेअर झाला. तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनवर 3 कोटी 56  हजार 81  रुपये किंमतीच्या वस्तू ऑनलाईन खरेदी झाल्या.

मोबाईलवरून 1 कोटी 60 लाख टेक्स मॅसेज पाठविले गेले. 23 कोटी 14 लाख ईमेल पाठविले गेले. युट्युबवर 500  तासांचे व्हीडिओ कंटेन्ट अपलोड करण्यात आले. ऑनलाईन इव्हेंटसाठी 10  लाख 63  हजार 398  किंमतीचा डाटा खर्च झाला. लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्वीटर वरुन 34  हजार 700 ट्विट शेअर झाले. गुगलवरुन 59 लाख सर्चिंग झाले. 7 हजार 435 रुपये क्रिप्टो करन्सीचे व्यवहार झाले. स्नॅप चॅटवरुन 24 लाख 30  हजार स्नॅप चॅट शेअर झाले.

1 लाख 4 हजार 600 तास झुम मिटींगसाठी खर्च झाले अशा रीतीने एकूण इंटरनेट धारकांनी एकूण 97 झेट्टाबाईट डाटा इंटरनेटवर नवनिर्मिती, काॅपी, डाऊनलोड, अपलाेडसाठी वापरल्याचे आकडेवीरी दर्शवित आहे.

एक झेट्टा बाईट म्हणजे काय ? तर चला पाहुया आता…

1024  गिगा बाईट म्हणजे एक टेरा बाइट. अशा 1024  टेराबाईट म्हणजे 1 पेटा बाइट तर 1024  पेटा म्हणजे एक एक्झा बाइट तर 1024  एक्झा बाइट म्हणजे 1  झेट्टा बाइट डाटा असतो.
171 तासांचे 4  हजार व्हीडीओ महिनाभर चालविले 1 टेरा बाइट डाटा संपतो. यावरुन 97  झेट्टाबाईट डाटा खर्च केला म्हणजे किती इंटरनेट डाटा संपला याचा हिशेब करा आता !