नाशिक : आतापर्यंत सोने, चांदी आणि इतर मौल्यवान दागीने चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, 4 ते 5 लाख किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकमधील येवला तालुक्यातील नायगावमध्ये हा प्रकार घडला. (in lasalgaon 6 ton fishes has been stolen from lake)
मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून एक वर्षाच्या कालावधीसाठी पाझर तलावाचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी लिलावात प्रशांत पानपाटील यांनी पाझर तलाव 20 हजार रुपयांच्या किमतीमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी घेतला. या तलावात त्यांनी मत्यव्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तलावात रोहू, मृगळ, कटला आणि कोंबडा या जातींचे मत्स्यबीज सोडले. त्यांच्यासोबत आणखी एक भागीदार होता. त्यानेसुद्धा पानपाटील यांच्यासोबत गुंतवणूक केली होती. दोखांनी मिळून 2 लाखांचे भांडवल गुंतवले होते.
व्यवसायात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला चांगले फळ आले. तलावात सोडलेल्या माशांच्या बिजामधून एक ते अर्धा किले वजनाचे मासे तयार झाले. मात्र, पानपाटील एका कामानिमित्त बाहेर गेले असता काही चोरट्यांनी येऊन तळ्यातील सुमारे 5 ते 6 टन मासे रात्रीतून चोरून नेले. दरम्यान, या चोरीमुळे युवकांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले आहे. ही चोरी कोणी केली असेल याचा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र, अद्याप कुणाचे नाव समोर आले नाही.
हिवाळा सुरु झाल्यामुळे राज्यात थंडी जाणवत आहे. पुण्यातील उजणी धरणातील पाणीसुद्धा थंड झाल्यामुळे येथील मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. उजनी धरणामुळे इंदापूर तालुक्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे. राज्यात गोड्या पाण्याची सर्वात मोठी मासेमारी याच धरणात होते. त्यामुळे इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मासळी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. मात्र, आवक घटलेली असताना, ग्राहकांकडून मागणी वाढल्याने माशांचे भाव वधारले आहेत.
एकाच मोबाईल क्रमांकावरून तयार करा संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड; UIDAI ची माहिती#aadharcard #UIDAIhttps://t.co/Nt3yMgfLpF
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
संबंधित बातम्या :
(in lasalgaon 6 ton fishes has been stolen from lake)