मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा यासारख्या मोठ्या शहरात पिक कापणीनंतर उरणारा पेंढा जाळल्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण वाढत आहे. आजकाल दिल्लीची हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे. दिल्ली-एनसीआर भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारक होत आहे. मंगळवारी तिथल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 250च्या आसपास होता. दिल्लीसह मोठ्या शहरांतील वातावरण काही दिवस खराब राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.( Increased Air Pollution Precaution tips)
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणाचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो. याशिवाय श्वास घेण्यास अडथळा, डोळ्यांची जळजळ, सायनस, खोकला आणि फुप्फुसासंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काही गोष्टींचा अवलंब करू शकता.
कोरोना काळात मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. शहरांत वायू प्रदूषण वाढत असताना विना मास्क घराबाहेर जाऊ नये. मास्क लावल्यानंतर वारंवार हातांनी स्पर्श करु नका. एकदा वापरलेला मास्क पुन्ह वापरू नये. रीयुजेबल मास्क असल्यास स्वच्छ धुवून आपण तो पुन्हा वापरू शकता. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.( Increased Air Pollution Precaution tips)
उघड्यावर मोकळ्या जागेत व्यायाम करणे शक्यतो टाळा. कारण सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असते. मैदानाऐवजी घरी किंवा व्यायामशाळेत व्यायाम करू शकता. मुलांनाही मैदानी खेळाऐवजी घरातील बैठे खेळ खेळण्यास सांगा. (Increased Air Pollution Precaution tips)
बरेच लोक घरात कृत्रिम एअर फिल्टरचा वापर करतात. या व्यतिरिक्त, घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कोरफड, वेली, मनीप्लांट, स्पायडर प्लांट इत्यादीसारख्या हवा स्वच्छ करणाऱ्या नैसर्गिक वनस्पती लावू शकता. यामुळे घरतील वायू प्रदूषण कमी होईल.
एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक हवेची योग्यता दर्शवतो. हवेची गुणवत्ता 0 ते 50 दरम्यान चांगली मानली जाते, 51 ते 100पर्यंत समाधानकारक, 101 ते 200पर्यंत मध्यम, 201 ते 300पर्यंत खराब, 301 ते 400पर्यंत अत्यंत खराब आणि 401 ते 500 दरम्यान गंभीर मानली जाते.
(Increased Air Pollution Precaution tips)
हेही वाचा :
मेंदूतल्या नसांपर्यंत पोहोचला जीवघेणा Coronavirus, AIIMS मध्ये समोर आलं धक्कादायक प्रकरण
Protein Food | प्रोटीनसाठी ‘आर्टिफिशियल सप्लीमेंट्स’ऐवजी, आहारात करा ‘या’ नैसर्गिक घटकांचा समावेश!