जळगाव येथे अॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा बैल प्रदर्शित करण्यात आला आहे.
हा बैल 9 फूट लांब आणि 6 फूच उंच आहे. तसेच बैलाचे वजन एक टन इतके आहे. हा बैल या प्रदर्शनात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या बैलाचे नाव गजेंद्र असं आहे. हा बैल 8 वर्ष सहा महिन्याचा आहे. खिलार जातीचा हा बैल आहे, असं बैलाच्या मालकाने सांगितले.
खान्देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ख्याती मिळवलेल्या अॅग्रोवर्ल्डचे या वर्षीचे प्रदर्शन जळगावात भरवण्यात आले. जळगाव शहरातील शिवतीर्थ (जी.एस.) मैदानावर अॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शनात एकूण 210 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात जिल्हातील लोकांनी हजेरी लावली.
हा बैल कृष्णा भोईट यांच्या मालकीचा आहे. देशातली सर्वात मोठा आणि उंच बैल हा महाराष्ट्रात आहे. या बैलाचा खर्च दिवसाला 500 रुपये आहे. बैलाचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदवण्यात यावे यासाठी शिफारस केली आहे, असं भोईटे यांनी सांगितले.