जळगाव : भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीमुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 49 हजार रुपयांवर पोहचला. सोन्याला मिळालेला हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे. तसेच येत्या काही दिवसात सोने प्रतितोळा 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांना आहे. (Jalgaon Gold Rate Increase India China Face Off)
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे दर यांचा मोठा परिणाम होत असतो. त्यात आता भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वधारत आहेत. त्यात कोरोनामुळे विदेशातून होणारी आवकही कमी असल्याने अधिक परिणाम जाणवत असल्याचे सांगितलं जात आहे.
सोन्याच्या भावात गेल्या 12 दिवसात सुमारे 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सोन्याचे भाव वाढतच आहेत. 9 जूनला 46 हजार 800 रुपयांवर असलेला सोन्याचा भाव 11 जूनला 47 हजार 200 वर पोहोचला. तर त्यानंतर 15 जूनला सोन्याचा भाव प्रतितोळा 47 हजार 800 रुपये इतका झाला. त्यानंतर 17 जूनला सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा गाठला. त्यानंतर 20 जूनपर्यंत सोन्याचा भाव स्थिर होता.
पण भारत-चीन सीमेवर वाढत्या तणावाचा परिणाम होऊन 20 जून रोजी सोन्याच्या भावात थेट 700 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 48 हजार 700 रुपयांवर पोहचला. त्यानंतर मंगळवारी सोन्याचे भाव 49 हजार रुपयांवर गेले. सोन्याच्या भावातील आतापर्यंतची हा नवा उच्चांकी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे सोन्याचा व्यापार बंद असताना कमॉडिटी बाजारात सोने 49 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहचले होते. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारातील हा नवा उच्चांक मानल जात आहे.
चांदीतही भाववाढ सुरुच
सोन्यासोबतच चांदीच्याही भावात सातत्याने वाढ सुरू आहे. 20 जूनला चांदीची भाववाढ झाली होती. त्यावेळी एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी वधारली होती. चांदी 50 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सराफ बाजार सुरू झाला त्यावेळी चांदी 50 हजारांवर होती. मात्र, त्यानंतर काहीशी घसरण होऊन ती 48 हजा 500 रुपयांवर आली होती. आता पुन्हा चांदी प्रति किलो 50 हजार रुपयांवर पोहोचला आहे. (Jalgaon Gold Rate Increase India China Face Off)
Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटकhttps://t.co/l3gFyyOwFX@NagpurPolice #NagpurCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2020
संबंधित बातम्या :