नवी दिल्ली : भारतात गेल्या 16 दिवसांमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये 16 पट वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 16 दिवसात देशातील ‘कोरोनाग्रस्तां’चा आकडा 1600 च्या उंबरठ्यावर आहे. मंगळवार 31 मार्चला एका दिवसातच तब्बल 315 नवे रुग्ण आढळले. (India Corona Patients Increase)
एक मार्चपर्यंत भारतात केवळ तीन कोरोनाबाधित होते, तर 15 मार्चला हा आकडा 98 वर पोहोचला होता. म्हणजेच ही संख्या शंभरच्या आत होती. परंतु 31 मार्चला देशातील ‘कोरोनाग्रस्तां’ची संख्या 1618 वर गेली आहे. भारतात ‘कोरोना’च्या प्रसाराचा वेग या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे.
सर्वात चिंताजनक स्थिती गेल्या तीन दिवसात उद्भवली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 28 मार्चला 918 वर असलेली भारतातील रुग्णसंख्या 626 ने वाढली आहे. ‘कोरोना’मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही 20 दिवसांमध्ये एकावरुन 50 च्या पुढे गेली आहे.
गेल्या बारा तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 240 ने वाढ झाली आहे. एक एप्रिलला दुपारपर्यंत हा आकडा 1637 वर आहे. यापैकी 133 जण उपचारानंतर बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 1466 जण अजूनही आजाराशी लढा देत आहेत.
महाराष्ट्रात स्थिती काय?
महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबईतच आठ बळी गेले आहेत. (India Corona Patients Increase)
कालच्या (मंगळवार 31 मार्च) दिवसभरात राज्यात 72 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण होते. मुंबईतील कालचे आणि आतापर्यंतचे आकडे पाहता काही तासातच 75 रुग्णांची भर पडल्याचं चित्र आहे. मुंबईत आता 167 कोरोनाग्रस्त असून पुण्यात 38 कोरोनाबाधित आहेत.
Increase of 240 #COVID19 cases in the last 12 hours. Total number of #COVID19 positive cases rise to 1637 in India (including 1466 active cases, 133 cured/discharged/migrated people and 38 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/6fi9XAoJOg
— ANI (@ANI) April 1, 2020
देशात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा
तारीख | कोरोनाग्रस्त रुग्ण |
---|---|
1 मार्च | 3 |
2 मार्च | 6 |
5 मार्च | 29 |
6 मार्च | 30 |
7 मार्च | 31 |
8 मार्च | 34 |
9 मार्च | 39 |
10 मार्च | 45 |
12 मार्च | 60 |
13 मार्च | 76 |
14 मार्च | 81 |
15 मार्च | 98 |
16 मार्च | 107 |
17 मार्च | 114 |
18 मार्च | 151 |
19 मार्च | 173 |
20 मार्च | 236 |
21 मार्च | 315 |
22 मार्च | 396 |
23 मार्च | 480 |
24 मार्च | 519 |
25 मार्च | 606 |
26 मार्च | 694 |
27 मार्च | 854 |
28 मार्च | 918 |
29 मार्च | 1024 |
30 मार्च | 1347 |
31 मार्च | 1618 |
India Corona Patients Increase