मुंबई : जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 25 नोव्हेंबरला एकाच दिवसात 12 हजार रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 24 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 11 हजार 733 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. (India Coronavirus cases and Deaths report 28 december 2020)
वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 19 लाख 88 हजार 71 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 27 लाख 88 हजार 667 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14 लाख 49 हजार 114 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 77 लाख 50 हजार 290 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 34 लाख 54 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 79 लाख 45 हजार 582 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 71 हजार 26 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 93 लाख 51 हजार 224 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 87 लाख 59 हजार 969 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 36 हजार 238 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश
अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 13,454,254, मृत्यू – 271,026
भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,351,224, मृत्यू – 136,238
ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,238,350, मृत्यू – 171,998
रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,215,533, मृत्यू – 38,558
फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,196,119, मृत्यू – 51,914
स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,646,192, मृत्यू – 44,668
यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,589,301, मृत्यू – 57,551
इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,538,217, मृत्यू – 53,677
अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,407,277, मृत्यू – 38,216
कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,290,510, मृत्यू – 36,214
महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा उसळी
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली असतानाच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील कोरोना नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजाराखाली गेला होता. मात्र, आता यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला, तर 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गुरुवारीदेखील पाच हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
संबंधित बातम्या
चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा
उद्धव ठाकरे सरकार कोरोना काळात अपयशी ठरलं :चंद्रकांत पाटील
(India Coronavirus cases and Deaths report 28 december 2020)