नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी एक लाख 60 हजारांच्या पार गेली. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट झाली आहे. तर देशातील कोरोनाबळींचा आकडाही चीनपेक्षा जास्त झाला आहे. (India crosses China in number of Corona Deaths)
चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीतही भारत पुढे सरकताना दिसत आहे. तुर्कीला मागे टाकून भारत आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतात कोरोनाचे एकूण 1 लाख 65 हजार 799 रुग्ण आहेत. तर जिथून ‘कोरोना’चा उगम झाला, त्या चीनमध्ये एकूण 82 हजार 995 रुग्ण आहेत. म्हणजेच भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधील कोरोनाग्रस्तांच्या दुप्पट झाली आहे. तर भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 4,711 वर गेली असून भारताने कोरोनाबळींमध्ये चीनलाही मागे टाकलं आहे. चीनमध्ये 4,634 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण
गेल्या 24 तासात भारतात तब्बल 7 हजार 466 नवे रुग्ण सापडले. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे.
With the highest spike of 7,466 more COVID-19 cases and 175 deaths reported in the past 24 hours, India’s COVID-19 tally reached 1,65,799
Read @ANI Story | https://t.co/HR7VR1cZbD pic.twitter.com/3ZJouCR9tB
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2020
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत तब्बल 17 लाख 68 हजार 461 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यानंतर ब्राझिल, रशिया, स्पेन, यूके, इटली, फ्रान्स, जर्मनी हे देश अनुक्रमे आहेत. चीन 15 व्या क्रमांकावर असून तुर्की आणि इराण या देशांना नुकतेच भारताने मागे टाकले.
भारताच्या पुढे (आठव्या क्रमांकावर) असलेल्या जर्मनीमध्ये 1 लाख 82 हजार 452 रुग्ण, तर सातव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्समध्ये 1 लाख 86 हजार 238 रुग्ण आहेत.
हेही वाचा : ‘कोरोना’ संकटात ‘WHO’ने काय-काय केलं? भारतासह 62 देशांकडून चौकशीची मागणी
कोरोनाबळींमध्येही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 3 हजार 330 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूके, इटली, फ्रान्स, स्पेन, ब्राझिल, बेल्जिअम, मेक्सिको, जर्मनी आणि इराण 10 देशांच्या यादीत आहेत. कोरोनाबळींनुसार भारत तेराव्या स्थानी आहे. बेल्जिअम आणि मेक्सिको यांची रुग्णसंख्या तुलनेने कमी असली, तरी बळींचे प्रमाण अधिक आहे. (India crosses China in number of Corona Deaths)