नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला (India Lockdown Extension) आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली.
लॉकडाऊन 4.0 च्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असेही यात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आता देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट झोन असे पाच झोन असतील.
‘हे’ बंदच राहणार
1.. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रो, लोकल सेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
5. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
6. विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम
7. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार
कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात पुढील गोष्टींना मर्यादांसह परवानगी
रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.
MHA issues order to further extend #lockdownindia till 31.05.2020, to fight #COVID19
New guidelines have permitted considerable relaxations in #Lockdown4 restrictions. States to decide various zones, taking into consideration parameters shared by @MoHFW_INDIA#IndiaFightsCOVID19 pic.twitter.com/AeMHvowaaH— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 17, 2020
दरम्यान जिल्ह्यातील झोननुसार नियमावली राज्य सरकारला ठरवता येणार आहे. मात्र रेड झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रेड झोनमधील लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी असणार आहे. कंटेनमेंट झोन आणि बफर एरिया जिल्हाधिकारी ठरवणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोठमोठे मॉल प्रतिबंधित क्षेत्रात बंद राहणार आहेत. तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडू शकतात, असेही यात स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊन 4.0 ची नियमावली
हेही वाचा – Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.
National Disaster Management Authority (NDMA) asks Ministries/ Departments of Government of India, State Governments and State Authorities to continue the lockdown measures up to 31st May 2020. pic.twitter.com/tn0i85kVSK
— ANI (@ANI) May 17, 2020
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (India Lockdown Extension) सांगितले होते.
संबंधित बातम्या :
Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार