VIDEO : भारतीय जवानांचा पुन्हा धमाका, पाकिस्तानी चौक्या उडवल्या

| Updated on: Mar 05, 2020 | 8:09 PM

लष्कराने पाकिस्तानी चौक्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अँटी टँक गायडेड मिसाईलचा वापर केला. त्याशिवाय, पाकिस्तानी चौक्यांवर दारुगोळा हल्लाही चढवला.

VIDEO : भारतीय जवानांचा पुन्हा धमाका, पाकिस्तानी चौक्या उडवल्या
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जवानांनी (Indian Army) नुकतंच जम्मू-काश्मीरच्या कुपवाडातील पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरमधील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कराने पाकिस्तानी चौक्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अँटी टँक गायडेड मिसाईलचा (anti-tank guided missiles) वापर केला. त्याशिवाय, पाकिस्तानी चौक्यांवर दारुगोळा हल्लाही चढवला. या घटनेचा व्हिडीओ नुकताच वृत्त संस्था एएनआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला.

पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर (Indian Army) भागात घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केलं जात होतं. याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत 24 आणि 25 फेब्रुवारीला पाकिस्तानी चौक्यांवर निशाणा साधत कारवाई केली. दहशतवादी या चौक्यांचा वापर भारतात घुसखोरी करण्यासाठी करत होते.

हेही वाचा : Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

OIC कडून LOC चा दौरा

दूसरीकडे, पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या इस्लामिक सहकार संस्थेच्या (OIC) दलाने पाकव्याप्त काश्मीर (POK) येथील नियंत्रण रेषेजवळील (LOC) चखोटी सेक्टरचा दौरा केला.

पाकिस्तानी मीडियाच्या बातमीनुसार, ओआयसीच्या महासचिवांच्या जम्मू-काश्मीर प्रकरणातील विशेष राजदूत युसूफ अल दोबे यांच्या नेतृत्वात सहा सदस्यीय दलाने नियंत्रण रेषेजवळील परिसराचा दैरा केला.

पाकिस्तान लष्कराची अधिकृत वृत्त संस्था आयएसपीआरच्या माहितीनुसार, ओआयसीच्या दलाला एलओसीच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि तिथे होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत सांगण्यात आलं . यामध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाची जबाबदारी भारतावर ढकलण्यात आली. तसेच, भारत एलओसीजवळील पाकिस्तानी (Indian Army) नागरिकांना निशाणा बनवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

‘देशाचा वेळ वाया घालवू नका’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

सोशल मीडिया सोडणार नाही, नरेंद्र मोदींनीच सांगितला ‘त्या’ ट्वीटचा खरा अर्थ

कोरोनाचा कहर, जगभरात 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू, भारतालाही कोरोनाचा धोका

सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आता थेट 3 वर्ष जेलची शिक्षा