नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या तणावाचे पडसाद तीव्र होताना दिसत आहेत (Indian Buisinessman boycott china). चीनला याचा व्यावसायिक स्तरावरील मोठा आर्थिक फटका बसताना दिसत आहे. चीनची मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात यानंतर चीनवर बहिष्काराची मागणी (#BoycottChina) होऊ लागली आणि आता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. भारतातील एका उद्योजकाने चीनमधील तब्बल 3000 कोटींची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील मोठमोठे उद्योजक चीनवरील बहिष्काराच्या मोहिमेत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. विविध क्षेत्रात व्यवसाय करत असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीने (JSW Group) सीमेवरील तणावपूर्ण स्थितीनंतर चीनमधून होणारी 40 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 3000 कोटी रुपयांची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 24 महिन्यांमध्ये ही आयात पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
जेएसडब्ल्यू समुहातील जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. नुकताच भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या (India-china clash) पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेत असल्याचं पार्थ जिंदाल यांनी सांगितलं. 14 अरब डॉलर किमतीच्या JSW समुहाची मालकी पार्थ जिंदाल यांचे वडिल सज्जन जिंदल यांच्याकडे आहे. हा उद्योग समुह पोलाद, ऊर्जा, सिमेंट आणि मुलभूत संरचना सारख्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करतो.
चीनमधून वार्षिक 40 कोटी डॉलरची आयात बंद
पार्थ जिंदाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “जेएसडब्ल्यू समुह वर्षाला चीनमधून 40 कोटी रुपयांच्या मालाची आयात करतो. यापुढे ही आयात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर विनाकारण केलेला हल्ला आश्चर्यकारक आहे. यामुळे ठोस कारवाईची गरज स्पष्ट होते. आम्ही (जेएसडब्ल्यू समूह) चीनमधून वर्षाला 40 कोटी डॉलरची आयात करतो. आता आम्ही पुढील 24 महिन्यात ही आयात शून्यावर आणण्याचा संकल्प करतो.”
The unprovoked attack by the Chinese on Indian soil on our brave jawaans has been a huge wake up call and a clarion call for action – we @TheJSWGroup have a net import of $400mn from China annually and we pledge to bring this down to zero in the next 24 months #BoycottChina
— Parth Jindal (@ParthJindal11) July 2, 2020
जेएसडब्ल्यूच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, की कंपनीच्या पोलाद आणि ऊर्जा व्यवसायासाठी 70 ते 80 टक्के आयात केली जाते. यात मशीनरी आणि देखभाल दुरुस्तीच्या उपकरणांचा समावेश आहे.
हेही वाचा :
PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी ‘सरप्राईझ’ भेट
PM Modi in Leh | पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Indian Buisinessman boycott china