मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Saurav ganguly help to poor people) केला. त्यामुळे संपूर्ण देशातील वाहतूक, दुकानं, कंपन्या सर्व बंद करण्यात आले आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान, काही गरीब कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. त्यामुळे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने या गरीब कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याशिवाय देशातील अनेक दिग्गज मंडळी या गरीब कुटुंबाच्या मदतीसाढी पुढे आले आहेत.
या लॉकडाऊन दरम्यान सौरव गांगुली गरीब कुटुंबांना तब्बल 50 लाख रुपयांचे तांदुळ वाटणार आहे असल्याचे त्याने सांगितले. तसेच गेल्या काहीदिवसांपासून सौरव गांगुली लोकांना कोरोनापासून स्वत:चे रक्षण करा आणि घरात बसा, असे आवाहनही करत आहे.
गौतम गंभीरकडूनही 50 लाख रुपयांची मदत
माजी क्रिकेटर आणि लोकसभा खासदार गौतम गंभीरनेही 50 लाख रुपयांची मदत आपल्या खासदार निधीतून केली आहे. तसेच गंभीरनेही सर्वांना घरात बसण्याचे आणि स्वत:चे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
बजरंग पुनियाकडून 6 महिन्याचा पगार
भारताचा फ्री स्टाईल रेसलर बजरंग पुनियानेही कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत देशाला मदत केली आहे. 26 वर्षाच्या पुनियाने आपल्या 6 महिन्याचा पगार हरियाणा कोरोना रिलीफ फंडमध्ये देणार आहे.
दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारताता सध्या 600 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. यामधील 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.