इस्लामाबाद : शेजारी देश पाकिस्तानमध्ये महागाईने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे (Inflation In Pakistan). वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक त्रस्त झाले आहेत. भाज्यांचे वाढलेले दर, दुधाचे भाव आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या भावामुळे आधी पाकिस्तानची जनता त्रस्त होती. त्यात आता गहू आणि साखरेचे भावही गगनाला भिडले आहेत. गव्हाच्या दराने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत (Inflation In Pakistan).
पाकिस्तानात सध्या एक किलो गव्हाचा भाव 60 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील गव्हाचा हा सर्वाधिक जास्त भाव आहे. साधारणपणे गव्हाचे भाव हे 20-22 रुपये प्रति किलो असतात.
पाकिस्तान मीडियाच्या बातमीनुसार, पाकिस्तान सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही गव्हाचे भाव 2400 रुपये प्रति 40 किलोच्या कमी नाही येऊ शकले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली होती. पण यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. येणाऱ्या डिसेंबरपर्यंत परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धान्य संघटनेने सरकारला निधी मागितला आहे. मात्र, सरकारने अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही.
पाकिस्तानात कांदा महागला
गहूच नाही, तर पाकिस्तानमध्ये भाज्याही महागल्या आहेत. बातम्यांनुसार, पाकिस्तानमध्ये कांदा 90 रुपये किलो, बटाटा 75 रुपये किलोने विकला जात आहे. तर टोमॅटोचे दर 150 रुपये किलो, आलं 600 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्याशिवाय, मटार 225 रुपये किलो, काकडी 117 रुपये किलो, भेंडी 70 रुपये किलो आणि फ्लॉवर 80 रुपये किलोने विकली जात आहे (Inflation In Pakistan).
रशियावरुन गव्हाची आयात
आपली भूक भागवण्यासाठी आता पाकिस्तान रशियाकडे गव्हाची मागणी करत आहे. या महिन्यात जवळपास 2 लाख मेट्रिन टन गहू रशियाहून पाकिस्तानला पोहेचणार आहे.
दुसरीकडे, धान्य संघटना आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी पाकिस्तान सरकारला एक प्रस्ताव पाठवण्याची तयारी केली आहे. यामध्ये चपाती प्रमाणे गहू, साखर आणि चिकनचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडण्यात येणार आहे.
चिकनही महागलं
पाकिस्तानात लग्नाचा सीझन सुरु झालं आहे. कोरोना विषाणूमुळे बंद असलेल्या लग्न सभागृहांनाही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या आदेशानंतर चिकनचे भाव अचानक वाढले आहेत. एका आठवड्यापूर्वी 90-110 रुपये किलो विकलं जाणारं चिकनचे दर आचानक 190-210 रुपये किलोपर्यंत पोहोचले. एका आठवड्यात पाकिस्तानात चिकनचे दर दुप्पट झाले आहेत.
पाकिस्तानला मंत्र्याचं वक्तव्य भोवलं, सौदी अरबच्या निर्णयाने पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरhttps://t.co/ia5TqkXYR3#Pakistan #SaudiArabia
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2020
Inflation In Pakistan
संबंधित बातम्या :
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा