नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने (International Women’s Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका दिवसासाठी आपलं ट्विटर हँडल सात महिलांना दिलं होतं. या सात अशा महिला होत्या ज्यांनी त्यांच्या त्यांच्या श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
यादरम्यान एका ट्विटर युझरने पंतप्रधानांच्या (International Women’s Day) ट्विटर हँडलचा पासवर्ड मागितला. हे अत्यंत आश्चर्यकारक होतं. मात्र, त्याहून आश्चर्यकारक बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या ट्विटर हँडलवरुन या ट्वीटवर रिप्लाय आला आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या ट्विटर हँडलचा पासवर्ड देण्यात आला.
हेही वाचा : ‘मी परमेश्वराला नाही मात्र मोदींना बघितलंय’, महिलेच्या प्रतिक्रियेनंतर पंतप्रधान मोदी भावूक
Please password bata dijiye
— Dhruv singh (@vikrantbhadaur6) March 8, 2020
मोदींच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करत होते. त्यामुळे आज ट्विटरवर संपूर्ण दिवसभर #SheInspiresUs ट्रेंड करत होतं. यादरम्यान, ध्रुव सिंह नावाच्या यूझरने ट्वीट केलं, “ कृपया पासवर्ड सांगा”.
यावेळी मोदी यांचं ट्विटर हँडल स्नेहा मोहनदास (Sneha Mohandoss) ऑपरेट करत होत्या. पासवर्ड मागणाऱ्या या व्यक्तीने कदाचित त्याला असं उत्तर मिळेल याचा विचारही केला नसेल.
New India…try logging in 🙂
@snehamohandoss https://t.co/ydnMKzsY0W
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2020
स्नेहा मोहनदास यांनी या ट्विटवर रिप्लाय दिला, “नवीन भारत… लॉग-ईन करण्याचा प्रयत्न करा”. मोदींच्या ट्विटर हँडलवरुन आलेल्या या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. अनेकांनी यावरुन मोदींचं कौतुकंही केलं.
कोण आहेत स्नेहा मोहनदास?
स्नेहा मोहनदास (Sneha Mohandoss) या ‘फूड बँक इंडिया’च्या (Food Bank India) संस्थापक आहेत. ही संस्था बेघर आणि उपाशी लोकांना मोफत अन्न पुरवठा करते. स्नेहाने या संस्थेची सुरुवात 2015 मध्ये चेन्नईत आलेल्या पुरानंतर केली. या संस्थेचा मुख्य उद्देश हा भूकेशी लढा देणे आणि (International Women’s Day) भारताला उपासमार मुक्त करणे आहे.
संबंधित बातम्या :
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार?
‘ये’ मोदी और मेरे अंदर की बात है : रामदास आठवले