IPL 2022, Orange Cap : आंद्रे रसेलच्या तुफान फलंदाजीचा डू प्लेसिसला फटका, ऑरेंज कॅपवर आता आंद्रे ‘राज’

| Updated on: Apr 02, 2022 | 7:31 AM

आंद्रे रसेलच्या 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या खेळीच्या बळावर ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय. कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला. कोलकाताचा आयपीएलमधील हा दुसरा विजय आहे. तर दुसरीकडे फॅफ डू प्लेसिसला ऑरेंज कॅपचा फटका बसलाय.

IPL 2022, Orange Cap : आंद्रे रसेलच्या तुफान फलंदाजीचा डू प्लेसिसला फटका, ऑरेंज कॅपवर आता आंद्रे राज
आंद्रे रसेलच्या तुफान फलंदाजीचा फॅफ डू प्लेसिसला फटका
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या खेळीच्या बळावर ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय. कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सवर सहा विकेट राखून विजय मिळवला. आंद्रेनं दोन चौकार आणि आठ षटकार लगावले. कोलकाताचा आयपीएलमधील हा दुसरा विजय आहे. तर दुसरीकडे आंद्रेच्या तुफान फलंदाजीचा फॅफ डू प्लेसिसला (faf du plessis)ऑरेंज कॅपचा फटका बसलाय. आंद्रे रसेलला क्रिकेट जगतातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हणतात? ते त्याने शुक्रवारी दाखवून दिलं. कुठल्याही षटकात सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पॉवर हिंटिंग लांब. लांबपर्यंत चेंडू पोहोचवण्याची ताकत त्याच्या फलंदाजीत आहे. आंद्रे रसेलने शुक्रवारी त्याच कौशल्याची चुणूक दाखवलीय. एका अवघड परिस्थितीत आंद्रे रसेल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. पंजाब किंग्सने (kxip) दिलेल्या 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चार बाद 51 अशी कोलकाताची अवस्था झाली होती. कोलकाताचा संघ (kkr) अडचणीत होता. हा सामना सुद्धा कोलकाता गमावणार का? असं अनेकांना वाटलं होतं. पण आंद्रे रसेलने सगळ चित्रच बदलून टाकलं. त्याने सामना लवकर संपवलाच. पण पंजाबच्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पाही बिघडवला.

कुठल्या सामन्यात सर्वाधिक धावा?

यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नव्हता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली होती. केकेआर विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसी फ्लॉप ठरला. पण पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. आता यानंतर डु प्लेसी  झटका देत ऑरेंज कॅपवर आंद्रे राज आलं आहे. आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर आंद्रे रसेलनं 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या बळावर ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

मागच्या सीजनमध्ये कोणाला मिळाली होती?

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. तर त्यापूर्वी ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी ऋतुराजने CSK मधील आपला सहकारी फाफ डु प्लेसीपेक्षा दोन धावा जास्त करुन ही ऑरेंज कॅप मिळवली होती. फाफने 633 तर ऋतुराजने 635 धावा केल्या होत्या. सध्या चालू सीजनमध्ये फाफ डु प्लेसीने पंजाब किंग्स विरुद्ध सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. दोन सामन्यात मिळून त्याने 93 धावा केल्या आहेत. आता मात्र, आंद्रेनं 31 चेंडूतील नाबाद 70 धावांच्या खेळी करून ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आघाडीवर असून त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. तर त्यानंतर केकेआरचाच टीम साऊदी आहे. साऊदीने 5 विकेट घेतल्या आहेत.

इतर बातम्या

Raj Thackerey gudipadwa speech live update : राज ठाकरेंच्या सभेचा टिझर आधीच रिलीज, आज पुन्हा बाळासाहेबांची झलक दिसणार?

Petrol,Diesel Price Hike : इंधनाच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

Gudi Padwa 2022 | आज गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व…