मुंबई : ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. (IPS Officer Transfer including Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil)
नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे.
नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार कृष्ण प्रकाश सांभाळणार आहेत. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची बदली झाली आहे.
मिलिंद भारंबे यांची मुंबईत गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (IPS Officer Transfer including Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil)
नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार आता अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथक) म्हणून पदभार स्वीकारतील. तर नागपूरचे पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) म्हणून रुजू होतील.
विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश निघाले.
VIDEO : TOP 9 News | जगभरातील टॉप 9 न्यूज | 2 September 2020 https://t.co/UvMuE2nEa4
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2020
संबंधित बातम्या :
मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती
(IPS Officer Transfer including Nashik Police Commissioner Vishwas Nangare Patil)