येरेव्हान (आर्मेनिया) : आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील युद्धात सर्व युद्धनियमांची पायमल्ली होताना दिसतेय. सीमेवरची लढाई आता अगदी शहरांमध्ये आलीय (Iran fears of regional war after conflict between Azerbaijaan and Armenia). यात सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष केलं जातंय. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचे बळी गेले आहेत. लाखो लोक जीव वाचवण्यासाठी लपून बसले आहेत. पण, त्यातच इराणच्या इशाऱ्यानंतर आता हे युद्ध आणखी विध्वंसक होण्याची शक्यता आहे.
अजरबैजान आणि आर्मेनिया हे दोन्ही देश जमिनीच्या छोट्या तुकड्यासाठी एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. असंख्य मिसाईल्स, तोफा, क्लस्टर बॉम्ब दोन्ही देशांमध्ये विध्वंस माजवत आहेत. जसजसे दिवस वाढतायेत, तसं तसं या दोन छोट्या देशांमधील युद्ध विनाशक बनत जातंय. केवळ रणभूमीच नव्हे तर, नागरी वस्त्याही या युद्धाच्या फेऱ्यात आल्या आहेत. या प्रचंड हल्ल्यांनी आर्मेनियातील स्टेपनकर्ट आणि अजरबैजानमधील गांजा ही शहरं अगदी दु:खात बुडून गेली आहेत.
आर्मेनियातील स्टेपनकर्टमधील दृश्य तर मन हेलावणारी आहेत. अजरबैजानच्या मिसाईल्सच्या माऱ्यांनी येथी सामान्य नागरिकांच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. स्टेपनकर्टमध्येही आता नेहमीची स्थिती झालीय. प्रत्येक क्षणी लोकांच्या मनात अजरबैजानच्या हल्ल्याची भीती असते. रस्त्यांवर स्मशान शांतता आहे. कुठे गाड्या जळतायेत, कुठे रस्त्याच्या मध्यभागी ग्रेनेड पडले आहेत. लोकं घरं सोडून पळालीयेत. भीतीनं लोकं जमिनीच्या खाली लपून बसले आहेत.
अजरबैजानच्या स्फोटक हल्ल्याच्या भीतीनं लोक जमिनीच्या खाली विटा आणि कॉक्रिटच्या भिंतींच्या आड लपले आहेत. या अनेक परिवारांतील लोकांच्या चेहऱ्यावरची भीती त्यांची आपबिती सांगते. लहान, थोर महिला-पुरुष मेणबत्त्यांच्या प्रकाशात युद्धाचा अंधकार दूर होण्याची वाट पाहतायेत. ज्याप्रमाणे अजरबैजान आर्मेनियाच्या शहरांना लक्ष करतोय, तसंच आर्मेनियन सैनिकांनीही अजरबैजानच्या गांजा शहरावर हल्ला चढवलाय. स्टेपनकर्टप्रमाणेच गांजातही मोठा विध्वंस झालाय. यात हजारो लोकांचे बळी जात आहेत.
लाखोंची लोकवस्ती असलेलं अजरबैजानमधील टारटर शहर आता भुताटकी लागलेल्या गावाप्रमाणे रिकामं झालंय. लाखो लोकांनी शहर सोडलंय, तर काही जण जमिनीच्या खाली लपले आहेत. पण, आता या दोन देशातील विध्वंस अधिक भयंकर होण्याची शक्यता आहे. कारण, आर्मेनियाकडून आता इराण युद्धात उतरण्याची शक्यता आहे. तसा इशाराच इराणचे राष्ट्रपती हसन रुहाणींनी दिलाय. “अजरबैजान आणि आर्मेनियात सुरु झालेले युद्ध व्यापक प्रमाणात क्षेत्रीय युद्ध भडकवू शकतं” असा इशारा रुहाणींनी दिलाय.
म्हणजे, आता इराणही युद्धाच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. अजरबैजान आणि इराण यांच्यातील सीमावाद जुना आहे. त्यातच अजरबैजान आणि आर्मेनियाच्या युद्धात इराणच्याही काही गावांना लक्ष्य करण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळंच चिडलेला इराणही आता 21व्या शतकातील या सर्वात विध्वंसक युद्धात उडी घेण्याची शक्यता आहे. अजरबैजान इराणचा शत्रु आहे. त्यामुळं आता इराण आर्मेनियाच्या बाजुनं लढण्याची शक्यता आहे. आर्मेनियाला रशियाचंही समर्थन आहे. आणि इराणचेही रशियाची चांगले संबंध असल्यानं, इराण आर्मेनियाची साथ देणार आहे.
रशियानं त्यांचे हत्यार इराण मार्गेच आर्मेनियाला पाठवले आहे. त्यामुळंच रुहानीचं संपूर्ण लक्ष या युद्धावर आहे. आधीच इराणनं मोठ्या प्रमाणात रशियाकडून शस्त्रखरेदी केलीय. त्यामुळं आता अजरबैजान आणि तुर्कीला धडा शिकवण्यासाठी इराण या युद्धात उतरला, तर मिनी वर्ल्ड वॉर होण्याची शक्यता आहे.
पुतिन आणि रुहाणीच्या संतापात पाकिस्तानही जळणार आहे. कारण, पाकिस्तानही उघडपणे अजरबैजानसोबत उभा राहिलाय. पाकिस्ताननं अजरबैजानला 36 JF-17 फायटर जेट देण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे, याचा मोबदला 10 वर्षात घ्यायला आणि अजरबैजानच्या पायलट्सला प्रशिक्षण द्यायलाही पाकिस्तान तयार झालाय. इराणच्या शत्रुला पाकिस्तान मदत करत असल्यानं, याची भरपाई इम्रान खानला करावीच लागणार आहे.
आर्मेनियासोबत मिळून इराण आणि रशिया थेटपणे अजरबैजान, तुर्की आणि पाकिस्तानवर प्रहार करणार आहे. त्यामुळंच इराणच्या विध्वंसाच्या धमकीनं संपूर्ण जग हादरलंय. परिणामी अजरबैजान, आर्मेनिया आणि नागोर्नो काराबाखमधील स्थिती अधिक विध्वंसक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
साखर, गहू ते कांदे-बटाटे, पाकिस्तानात विक्रमी महागाई, किलोचा भाव…..!
Iran fears of regional war after conflict between Azerbaijaan and Armenia