मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (IRCTC cancel private train booking) आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशने (IRCTC) आपल्या खासगी ट्रेनच्या बुकिंग 30 एप्रिलपर्यंत रद्द (IRCTC cancel private train booking) केल्या आहेत.
“IRCTC ने 30 एप्रिलपर्यंत खासगी रेल्वेची सर्व बुकिंग रद्द केली आहे. IRCTC कडून तीन खासगी रेल्वे चालवण्यात येतात. ज्यामध्ये दोम तेजस ट्रेन आणि 1 काशी महाकाल एक्सप्रेसचा समावेश आहे. तिन्ही ट्रेनमध्ये बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना त्यांचे पूर्ण पैशे रिफंडद्वारे मिळणार आहेत”, असं IRCTC च्या प्रवक्त्यांनी सांगितले.
Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) has decided to suspend bookings for trains that are run by it, till 30th April. IRCTC runs three trains as of now, 2 Tejas trains and 1 Kashi Mahakal Express: IRCTC Spokesperson pic.twitter.com/7IC2LJekws
— ANI (@ANI) April 7, 2020
लॉकडाऊनमुळे या तिन्ही ट्रेनमध्ये 25 मार्च ते 15 एप्रिलपर्यंतची सर्व बुकिंग बंद करण्यात आली होती. पण IRCTC कडून आता 30 एप्रिल पर्यंत सर्व बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे IRCTC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
IRCTC च्या ट्रेन कोणत्या मार्गावर चालतात?
दरम्यान, दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात चार हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 124 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 352 लोक या आजारातून कोरोनामुक्त झाले आहेत.