1 सप्टेंबरपासून देशातील काही नियमांमध्ये ( 1 September Rule Change) बदल होणार आहे. यातील काही नियमामुळे (1 September Rule Change) तुमचा फायदा होणार असून काहींमुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेतून पैसे काढणे, TDS यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
-
-
IRCTC वर रेल्वे तिकीट बुकींग 1 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या वेबसाईटवरुन जर तुम्ही तिकीट बुक केलेत, तर त्यावर तुम्हाला अतिरिक्त सेवा शुल्क भरावे लागणार आहे.
-
-
Car parking
-
-
जर तुम्ही वर्षाला बँक अकाऊंटमधून 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम काढलात, तर तुम्हाला 2 टक्के जास्त TDS (Tax Deducted at Source) भरावा लागेल.
-
-
आतापर्यंत बँकेतून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याची माहिती आयकर विभागाला (Income Tax) द्यावी लागायची. मात्र 1 सप्टेंबरपासून ही मर्यादा बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता कर दात्यांच्या बँकेतील प्रत्येक छोट्यापासून मोठ्या व्यवहारापर्यंत नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच कर भरणाऱ्यांच्या बँकेतील सर्व व्यवहारांची माहितीही तपासून घेतली जाणार आहे.
-
-
– आता कॅटेगरी मेन्यूमध्ये Individual ऑप्शन निवडा. यानंतर सगळी महत्त्वाची कागदपत्रं सबमिट करा.
-
-
जर तुम्ही 1 सप्टेंबरनंतर नवे घर खरेदी करणार असाल, तर तुम्हाला जादा TDS भरावे लागणार आहे. कारण कार पार्किंग, क्लब मेंबरशिप यासारख्या अन्य सुविधांचे खर्चही TDS मध्ये मोजले जाणार आहेत.
-
-
जर तुम्हाला घराची डागडुजी करणार असाल आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 टक्के TDS भरावे लागेल.
-
-
पेटीएम, फोन पे तसेच गुगल पे यासारख्या मोबाईल ई- वॉलेटचा वापर करणाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत KYC पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा 1 सप्टेंबरपासून तुम्हाला मोबाईल वॉलेटचा वापर करता येणार नाही. नुकतंच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध मोबाईल वॉलेट कंपन्यांना नोटीस पाठवले आहे.
-
-
आतापर्यंतच शासकीय कामकाजाची वेळ ही 10 ते 5 होती. मात्र आता बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजता उघडणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी बँकांशी निगडीत काम पूर्ण करु शकता.