हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO Scientist murder) काम करणाऱ्या अधिकाऱ्याची हत्या झाली. हैदराबादेतील उच्चभ्रू परिसरातील अमीरपेट (ISRO Scientist murder) इथल्या अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एस सुरेश (S Suresh) असं हत्या झालेल्या 56 वर्षीय संशोधकाचं नाव आहे. सुरेश हे इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये (National Remote Sensing Centre – NRSC) कार्यरत होते.
Hyderabad Police: SR Suresh Kumar, who was working as a scientist at National Remote Sensing Centre (NRSC) of ISRO, found dead at his residence in Ameerpet. Body shifted to Osmania hospital for post mortem. Investigation is underway pic.twitter.com/EZFvSHM8JR
— ANI (@ANI) October 2, 2019
एस सुरेश हे मूळचे केरळचे होते. मात्र हैदराबादेत ते फ्लॅटमध्ये एकटेच राहात होते. मंगळवारी ते कार्यालयात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर कॉल केला. मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आला. पत्नी चेन्नईतील बँकेत कार्यरत आहे.
पत्नी इंदिरा यांनी पोलिसांना फोन करुन हैदराबादकडे रवाना झाल्या. त्यादरम्यान, अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये सुरेश यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यावेळी त्यांचा मृतदेहच समोर दिसला.
सुरेश यांच्या डोक्यावर व्रण आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार सुरेश यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठवला.
सुरेश यांची हत्या का आणि कुणी केली असावी याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. मात्र ते इस्रोमध्ये कार्यरत होते हे हल्लेखोरांना माहित होतं का, त्याचा हत्येशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तर पोलिसांना शोधावी लागतील.