आयटीआय विद्यार्थ्याची गळफास घेत वसतिगृहात आत्महत्या

| Updated on: Feb 19, 2020 | 6:32 PM

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या (boy suicide in hostel) केली आहे.

आयटीआय विद्यार्थ्याची गळफास घेत वसतिगृहात आत्महत्या
Follow us on

ठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या (boy suicide in hostel) केली आहे. ही धक्कादायक घटना अंबरनाथच्या वसतिगृहात घडली.  या घटनेने संपूर्ण वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्वप्नील दुसाणे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव (boy suicide in hostel) आहे.

स्वप्नीलने प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वप्नील हा मूळचा जळगांवचा राहणारा आहे. अंबरनाथ औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर या एक वर्षाच्या कोर्ससाठी त्याने प्रवेश घेतला होता. दरम्यान, स्वप्नीलने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

स्वप्नील काल (18 फेब्रुवारी) संध्याकाळी रडत असलेला स्वप्नील वसतिगृहात राहत असलेल्या खोलीमध्ये जाताना त्याच्या मित्रांनी पाहिले होते. त्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा बंद करुन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोदं करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.