जळगाव : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांप्रमाणे कोरोनाबाधित (Jalgaon Corona Patient died) मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 17 जणांना कोरोनामुळे प्राण गमावावा लागला आहे. आज (2 एप्रिल) जळगावमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगावमध्ये मृत्यू झालेल्या या रुग्णाचा अहवाल काल (Jalgaon Corona Patient died) कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी याबाबतची माहिती दिली.
दरम्यान राज्यात आतापर्यंत 17 जणांना कोरोनामुळे जीव गमावावे लागले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील असून मुंबईत आतापर्यंत 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. तर पुणे, नवी मुंबई, बुलडाणा, पालघर, जळगाव या ठिकाणी प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीनशेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं (Jalgaon Corona Patient died) आहे.
महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
नवी मुंबई – 13
कल्याण – 10
ठाणे – 8
वसई विरार – 6
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
अहमदनगर – 8
बुलडाणा – 5
यवतमाळ – 4
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
नाशिक – 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 1
एकूण 341