जळगाव : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Jalgaon Corona Update) चालली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई, पुणे शहरांसह आता इतर जिल्ह्यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील 4 कोरोना संशंयित रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी (1 मे) जिल्हा (Jalgaon Corona Update) रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांचा सातत्याने वाढणारा आकडा सातत्याने वाढत आहे.
काही दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 47 व्यक्तींची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. सुदैवाने यातील 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या प्रत्येकी एक व्यक्ती हे अमळनेर, जोशीपेठ या ठिकाणचे आहेत. तर इतर दोन व्यक्ती हे पाचोरा भागतील आहेत.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जळगाव शहरासह अमळनेर, पाचोरा आणि भुसावळ या ठिकाणची कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार पार
महाराष्ट्रात काल (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Jalgaon Corona Update) दिली.
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे हेही घडतंय, कोरोना लसचा फॉर्म्युला चोरीला जाण्याची भीती, गुप्तहेर संशोधनाच्या मागावर
मुंबई-पुण्यात अडकलेल्यांना गावी जाण्याची व्यवस्था होणार का? राजेश टोपे म्हणतात…