जळगाव : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत (Jalgaon health officer PPE kit Thrown without Disposal) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे जळगावात मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर अंगावर असणारे पीपीई किटची विल्हेवाट न लावता इतरत्र टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून (Jalgaon health officer PPE kit Thrown without Disposal) मृत्यूंमध्येही वाढ होत आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड कोरोनाचा बळी जात आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, 2 ते 3 कर्मचारी तसेच मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीत संबंधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात. यावेळी मृतदेह हाताळणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णवाहिका चालकाला पीपीई किट परिधान करणे बंधनकारक आहे.
कोरोनाग्रस्त मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधितांनी आपल्या अंगावरील पीपीई किटचीदेखील योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे नियमानुसार बंधनकारक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्या पीपीई किटला जाळून टाकावे किंवा जमिनीत पुरावे, असा नियम आहे. तसेच एकदा वापरलेले पीपीई किट दुसऱ्यांदा वापरता येत नाही. मात्र जळगावात दुर्देवाने तसे होताना दिसत नाही.
कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनेकदा आरोग्य कर्मचारी स्मशानभूमीतच पीपीई किट फेकून निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत जळगावातील नेरीनाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. पण प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली (Jalgaon health officer PPE kit Thrown without Disposal) जात नाही.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्यात दिवसभरात 125 नवे कोरोनाबाधित, आठ रुग्णांचा बळी