लाहोर : 26/11 चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकविरोधी दहशवादी कारवाईबाबत भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाफिज सईदची महत्त्वाची भूमिका होती. त्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला सोपवले होते. मात्र हाफिजच्या मुसक्या आवळण्यात टाळाटाळ करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकावं लागलं आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
Jamatud Dawa’s Hafiz Saeed arrested and sent to judicial custody: Pakistan media (file pic) pic.twitter.com/1Txu9BlvoK
— ANI (@ANI) July 17, 2019
पाकिस्तानमध्ये 26/11 बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारताने दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या.
अटक कशी झाली?
हाफिज सईद लाहोरवरुन गुजरांवालाकडे जात होता. त्यावेळी पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी हाफिज सईदला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आपल्या अटकेविरोधात न्यायालयात धाव घेण्याची भूमिका हाफिज सईदने घेतली आहे.
मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात कसाब आणि इतर दहशतवाद्यांना हाफिजने फोनद्वारे माहिती पुरवली होती.
पाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही.
कोण आहे हाफिज सईद?