जम्मू बस स्टॅण्ड ग्रेनेड हल्ल्यातील आणखी एकाचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

श्रीनगर: जम्मू बस स्टॅण्डवर गुरुवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. बस स्टॅण्डवर उभ्या असलेल्या बसवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जवळपास 33 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात काल एकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आजही एकाचा उपचारादरम्यान अंत झाला. या हल्ल्याप्रकरणी यासिर भट्ट उर्फ यासिर अहमद नावाच्या हल्लेखोराला कालच बेड्या ठोकण्यात […]

जम्मू बस स्टॅण्ड ग्रेनेड हल्ल्यातील आणखी एकाचा मृत्यू
Follow us on

श्रीनगर: जम्मू बस स्टॅण्डवर गुरुवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. बस स्टॅण्डवर उभ्या असलेल्या बसवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जवळपास 33 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात काल एकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आजही एकाचा उपचारादरम्यान अंत झाला.

या हल्ल्याप्रकरणी यासिर भट्ट उर्फ यासिर अहमद नावाच्या हल्लेखोराला कालच बेड्या ठोकण्यात आल्या. यासिर भट्टने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या सांगण्यावर हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

ग्रेनेड हल्ल्यानंतर काही तासात जम्मू काश्मीर पोलिसांनी हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या.

महत्त्वाचं म्हणजे दहशतवादी संघटना यापूर्वी काश्मीर परिसरातच हल्ले करत होते, मात्र कालचा ग्रेनेड हल्ला जम्मूमध्ये झाल्याने चिंता वाढली आहे. सैन्य आणि पोलिसांनंतर आता दहशतवादी सर्वसामान्यांनाही टार्गेट करत आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत का असा संशय आहे.

14 फ्रेबुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात तब्बल 40 जवान शहीद झाले. त्याचा बदला म्हणून सैन्यदलाने काश्मीरमध्ये धरपकड केली. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला.

हल्ला कधी आणि कुठे झाला?

जम्मू बस स्टॅण्डवर गुरुवारी सकाळी ग्रेनेड हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा एक धमाका झाला. या हल्ल्यात 33 जण जखमी झाले होते, तर उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये राहणाऱ्या शारिक या 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

हा हल्ला सकाळी 11.30 च्या सुमारास झाला. हल्ल्यातील जखमींना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.  हा हल्ला ग्रेनेडने केल्याची पुष्टी जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एम के सिन्हा यांनी दिली होती.

दरम्यान या हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत आणि जखमींना 20-20 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली.

संबंधित बातम्या

जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या