श्रीनगर : हिंदूचं तीर्थस्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर दहशवादी हल्लाचं सावट आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहाता राज्य सरकारने खबरदारी म्हणून ही यात्रा स्थगित केली आहे. तसेच, यात्रेकरुंसह पर्यटकांनाही काश्मीर तातडीने रिकामं करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सुरक्षा दलाला अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशनदरम्यान स्नायपर रायफल आढळून आल्या. त्यानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
J&K govt issues security advisory in the interest of #AmarnathYatra pilgrims and tourists, “that they may curtail their stay in the Valley immediately and take necessary measures to return as soon as possible”, keeping in view the latest intelligence inputs of terror threats. pic.twitter.com/CzCk6FnMQ6
— ANI (@ANI) August 2, 2019
अमरनाथला जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी (2 ऑगस्ट) सुरक्षा दलाला आयईडी, अँटी पर्सनल माईन आणि स्नायपर रायफल आढळल्या. दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याची योजना आखत आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाला काही दिवसांपूर्वी गुप्त संस्थेकडून मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि सीआरपीफच्या जवानांनी अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर लक्ष ठेऊन होते. यादरम्यान, जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं.
या सर्च ऑपरेशनमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलाला यश प्राप्त झालं. सुरक्षा दलाने या परिसरातून मोठ्या प्रमाणात आयईडी आणि पाकिस्तानच्या ऑर्डिनंस फॅक्ट्रीमध्ये निर्मित अँटी पर्सनल माईन्स आढळल्या. त्यासोबतच एम-24 स्नायपर रायफलही यात्रेच्या मार्गात मिळाली. यावेळी मिळालेली आयईडी स्फोटकं इतक्या मोठ्या प्रमाणात होती की त्याने खूप नूकसान होऊ शकलं असतं.
“अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे काश्मीरची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, तसेच अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांची सुरक्षा पाहता काश्मीर खोऱ्यात तात्काळ सर्व प्रकारच्या यात्रा थांबवण्यात येत आहेत. अमरनाथ यात्रेकरुंनी तात्काळ त्यांची यात्रा थांबवावी आणि लवकरात लवकर घाटी सोडावी”, अशी सूचना जम्मू-काश्मीर सरकारच्या गृहखात्याने केली.
अमरनाथ यात्रा ही 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, राज्य सरकारच्या सूचनेनंतर ही यात्रा तात्काळ थांबवण्यात आली आहे.
JK Govt has asked Tourists and Amarnath Yatris to leave Kashmir immediately in view of a security threat.
Is the Government considering any such advisory for locals also?
Should Kashmiris also migrate to other places or is it that our lives do not matter? pic.twitter.com/Tb5SHxK4o5
— Shah Faesal (@shahfaesal) August 2, 2019
जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षा कारणांमुळे पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरुंना तात्काळ काश्मीर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर सरकार स्थानिक लोकांसाठीही अशाप्रकारची खबरदारी घेण्यात येईल का? काश्मिरी लोकांनाही इतर ठिकाणी स्थलांतरित केलं जाईल? की त्यांच्या आयुष्याची काही किंमतच नाही, असा प्रश्न माजी आयएएस आणि जेके पीपल्स मुव्हमेंटचे नेते शाह फैसल यांनी उपस्थित केला आहे.
M-24 स्नायपर रायफल काय आहे?
अँटी पर्सनल माईन्स
2017 मध्येही यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला
2017 मध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 32 भाविक जखमी झाले होते. त्यावेळी हल्लेखोर हे मोटार सायकलने आले होते. पहिले त्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर यात्रेकरुंच्या बसवर निशाणा साधला होता.
पाहा व्हिडीओ :