कोल्हापूर : एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण (Javed Akhtar on Waris Pathan) यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन, त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनीही वारीस पठाण (Javed Akhtar on Waris Pathan) यांच्यावर सडकून टीका केली. “बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल”, असा हल्लाबोल जावेद अख्तर यांनी केला.
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहे, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केलं होतं. त्यावरुन देशभरात वाद उफाळला आहे.
#WATCH AIMIM leader Waris Pathan: …They tell us that we’ve kept our women in the front – only the lionesses have come out&you’re already sweating. You can understand what would happen if all of us come together. 15 cr hain magar 100 ke upar bhaari hain, ye yaad rakh lena.(15.2) pic.twitter.com/KO8kqHm6Kg
— ANI (@ANI) February 20, 2020
जावेद अख्तर यांनीही पठाण यांच्यावर निशाणा साधला. “15 करोडचा ठेका तुम्हाला कोणी दिला? आशा लोकांपासून सावध राहीलं पाहिजे. एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल” असं जावेद अख्तर म्हणाले.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृती जागर सभेनिमित्त जावेद अख्तर कोल्हापुरात आले होते. यावेळी तुषार गांधींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
जावेद अख्तर यांचा हल्लाबोल
जावेद अख्तर म्हणाले, “देशातील युवक आज बेचैन आहे. 36 विद्यापीठं खदखदत आहेत. भाजप हा देशातील अनोखा पक्ष आहे. भाजप ही RSS ची शाखा आहे. मुस्लिम लीग आणि RSS हे इंग्रजांचे एजंट होते. कोणीही आरएसएस आणि मुस्लिम लीगचा नेता अर्ध्या तासासाठीही जेलमध्ये गेला नाही. स्वातंत्र्य चळवळीला तोडण्याचं काम या दोघांनी पूर्ण शक्तीने केलं.
चार हजार वर्षांपूर्वीचे संस्कार आजही कायम आहेत. हिटलरच्या जमान्यात किमान अर्थव्यवस्था तरी ठीक होती, आता तर देश 30 ते 40 देशांच्या यादीत गेला आहे. यांची युटिलिटी कमी होत आहे, असं जावेद अख्तर म्हणाले.
वारीस पठाण काय म्हणाले?
कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात वादग्रस्त विधानं केलं. “आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना. इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या”, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं.
संबंधित बातम्या
दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर, वारीस पठाणांना मनसेचा इशारा!