मुंबई : जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आगळंवेगळं कौतुक केलं आहे (Jayant Patil on Rajesh Tope). आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी राजेश टोपेंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिलेदाराचा अभिमान असल्याचंही नमूद केलं. जयंत पाटील यांनी ट्विटरवर राजेश टोपेंच्या कामाचा एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली.
जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थ्याची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम. जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठं आहे, पण त्यावर मात करू.” यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये 5 वाजता 5 मिनिटं (#5baje5minute) असा हॅशटॅगही वापरला.
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने @rajeshtope11अहोरात्र झटतायेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या @NCPspeaks च्या शिलेदाराला सलाम, जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठंय पण त्यावर मात करू. #5baje5minute pic.twitter.com/fWdoFZj1G5
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 22, 2020
कोणताही बडेजाव नाही, कोणतीही प्रसिद्धी नाही. राजेश टोपे अत्यंत संयमाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावत कोरोना व्हायरस विरोधात जमिनीवर उतरुन काम करत आहेत. याचीच नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. जयंत पाटील यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं कौतुक केलं.
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिलेदार ज्यापद्धतीने काम करत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे असं म्हटलं. या व्हिडीओत जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून केलेल्या कामांचा उल्लेखही केला. तसेच त्यात त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्याचे फोटोही दाखवण्यात आले आहे.
ना.जयंतराव पाटील साहेब आपण जी कौतुकाची थाप दिली ती मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. ‘Work is worship’ याप्रमाणे कार्य करत राहणे हीच माझी पुजा आहे.पवार साहेब,खा.सुप्रियाताई, ना.अजितदादा आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या आभारी आहे. https://t.co/pVAwopVoj6
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 22, 2020
जयंत पाटील यांच्या कौतुकावर स्वतः राजेश टोपे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “जयंत पाटील आपण जी कौतुकाची थाप दिली त्यामुळे मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. ‘Work is worship’ याप्रमाणे कार्य करत राहणे हीच माझी पुजा आहे. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आभारी आहे. जनतेच्या आरोग्यासाठी मी लढा देणार आहे.”
संबंधित बातम्या:
‘मीच माझा रक्षक’, हा मंत्र महाराष्ट्राने पाळावा, राजेश टोपेंचं आवाहन
Jayant Patil on Rajesh Tope