नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितलं (Jharkhand Chief Electoral Officer) आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची खिल्ली उडवताना ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सुरुवातीला, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
Correction: Election Commission of India has sought response from Jharkhand Chief Electoral Officer, on Union Minister Smriti Irani’s complaint against Rahul Gandhi for his ‘rape in India’ remark during a rally in Godda on December 12. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/LURczyjquk
— ANI (@ANI) December 16, 2019
‘इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे की भारतीय महिलांवर बलात्कार केला जावा, असं वक्तव्य नेता करत आहेत. हा राहुल गांधींचा संदेश देशातील जनतेला आहे का?’ असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता. राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी इराणी यांनी (Jharkhand Chief Electoral Officer) केली होती.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
‘भारत देश जगात बलात्काराची राजधानी म्हणून ओळखला जातो. परदेशी राष्ट्रं प्रश्न विचारत आहेत की भारत आपल्या मुली आणि बहिणींचा सांभाळ करण्यात सक्षम का ठरत नाही? उत्तर प्रदेशातील एका भाजपच्या आमदाराने एका महिलेवर बलात्कार केला आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत.’ अशा शब्दात केरळमधील वायनाडमध्ये खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती.
मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी
‘आता जिकडे बघाल, तिथे रेप इन इंडिया. वर्तमानपत्र उघडा, झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या आमदाराने महिलेवर रेप केला. त्यानंतर गाडीचा अपघात झाला, नरेंद्र मोदी एक शब्दही नाही बोलले. प्रत्येक राज्यात रेप इन इंडिया. नरेंद्र मोदी म्हणाले मुली शिकवा, मुली वाचवा, पण तुम्ही हे नाही सांगितलंत की कोणापासून वाचवायचं आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचं आहे’ असं राहुल गांधी झारखंडमधील गोडामध्ये बोलले होते.
राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’वरुन स्मृती इराणी संसदेत आक्रमक, कनिमोळींकडून बचाव
राहुल गांधींचा पाय खोलात
भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या माफीनाम्याची मागणी उचलून धरली होती. त्यानंतर, भाजपची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला होता. त्यानंतर देशभरातून राहुल गांधींविरोधात संतापाची लाट पसरली होती. फक्त भाजपच नाही, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही निषेध नोंदवला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सावरकरप्रेमींनी राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.
Jharkhand Chief Electoral Officer