सामूहिक बलात्कारानंतर 6 वर्षीय मुलीची हत्या, कल्याणमध्ये पकडलेल्या आरोपीला 24 दिवसात फाशीची शिक्षा

| Updated on: Mar 04, 2020 | 4:36 PM

एका 6 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात (Death penalty Gang Rape accused) आली.

सामूहिक बलात्कारानंतर 6 वर्षीय मुलीची हत्या, कल्याणमध्ये पकडलेल्या आरोपीला 24 दिवसात फाशीची शिक्षा
Follow us on

कल्याण : एका 6 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात (Death penalty Gang Rape accused) आली. फरार असलेल्या मुख्य आरोपीला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे या मुख्य आरोपीसोबत इतर दोन आरोपींचा नाव, पत्ता सुद्धा झारखंड पोलिसांना दिला. अखेर या प्रकरणी 3 मार्चला झारखंडच्या दुमका सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

केवळ 24 दिवसात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. मुख्य आरोपीला पकडणाऱ्या आणि या प्रकरणात सहभागी दुसऱ्या आरोपींना शोधणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला आहे.

झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 फेब्रुवारीला एका 6 वर्षीय अल्पवयीन चिमुकालीवर बलात्कार केला. तिच्या एका नातेवाईकाने आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर तिची हत्या करून एका जागेत तिचा मृतदेह पुरला. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला.

मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी मिठू राय हा फरार झाला. त्यादरम्यान दुमका पोलिसांनी माहिती मिळाल्यानुसार मिठू हा मुंबईच्या दिशेने पळाला होता. त्यानंतर दुमका पोलीस स्टेशनचे एस.पी रमेश यांनी कल्याण पोलिसांना संपर्क साधला. ज्या ट्रेनमध्ये आरोपी बसला होता, ती ट्रेन 20 मिनिटांत कल्याण स्टेशनला पोहोचणार (Death penalty Gang Rape accused) होती.

पोलिसांकडे फक्त 20 मिनिटे होती. या 20 मिनिटात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याण स्टेशनला रवाना झाले. पोलिसांनी मिळालेल्या फोटोच्या आधारे आरोपीला मिठू राय याला पकडले. अखेर 8 फेब्रुवारीला पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडले.

आरोपी मिठू रायच्या चौकशीदरम्यान इतर दोन आरोपी पंकज मोहाली आणि अशोक राय या दोघांचा नाव, पत्ता ही सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेच्या 24 दिवसात या प्रकरणाची सुनावणी करुन दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांमुळे हे शक्य झाले. या गुन्ह्यात आरोपीला पकडून त्याच्या साथीदारांचा छडा लावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंडे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सुरेश डांबरे, दीपक सरोदे सह त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा डीसीपी विवेक पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात (Death penalty Gang Rape accused) आला.