रांची : एकीकडे नवऱ्याशी गुलूगुलू बोलणारी मैत्रिणही काही महिलांना सहन होत नाही, मात्र झारखंडमध्ये एका महिलेने चक्क आपल्या नवरोबाचं दुसरं लग्न (Husband Second Marriage) लावून दिलं. सरला महतो यांनी 60 वर्षांच्या पतीचं लग्न 35 वर्षीय तरुणीशी लावून दिलं.
झारखंडमधील राजनगरमध्ये असलेल्या चांवरबांधा भागात हा प्रकार घडला. लालमोहन महतो आणि सरला महतो यांचं तीस वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सरला आणि लालमोहन यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्नही झालं आहे. मात्र मुलाच्या हव्यासातून महतो दाम्पत्याने अजब निर्णय घेतला.
सरला महतो यांनी अधिकृतरित्या ‘नवऱ्याला दुसरी बायको’ घरात आणली. 60 वर्षीय लालमोहन यांनी आपल्या मुलींच्या वयाच्या महिलेसोबत दुसरा विवाह केला. या महिलेचं नाव आहे चैती महतो.
हेही वाचा : बलात्कार पीडितेची जाळून हत्या, चितेवर मिठी मारत आई-वडिलांचा आक्रोश
राजनगरमधील छोटा खिरीमध्ये राहणाऱ्या चैतीसोबत भीमखांदा मंदिरात दोघं विवाहबंधनात अडकले. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय तर उपस्थित होतेच, पण सरलाच्या माहेरची माणसंही हजर होती.
दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संमतीने जर आनंदात राहणार असतील, तर काय हरकत आहे? असं समाजसेवक रामरतन महतो म्हणतात. एकीकडे सरला-लालमोहन यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर दुसरीकडे चैतीचंही वय वाढत चाललं होतं. तिचं लग्न होत नसल्यामुळे दोन्ही कुटुंबाने एकत्र येत हा निर्णय (Husband Second Marriage) घेतल्याचं म्हटलं जातं.