वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघी 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. जो बायडन यांच्या प्रचारातील मुद्यांनुसार 5 लाख प्रवासी भारतीय नागरिकांनाी अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. बायडन यांच्या शपथविधीनंतर यादृष्टीने कामकाज सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Joe Biden may grant citizenship to over five lakh Indians)
अमेरिकेतील ज्या प्रवासी नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत, अशा 1 कोटी 10 लाख लोकांना नागरिकत्व देण्याची योजना जा बायडन यांच्याकडून आणली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 5 लाख प्रवासी भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय अमेरिकेत दरवर्षी 95 हजार शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश देण्याची यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. ही माहिती जो बायडन यांच्या प्रचार अभियानाच्या धोरणात्मक पत्रिकेत देण्यात आली आहे.
जो बायडन यांच्या प्रचार अभियानानं जारी केलेल्या धोरणांमध्ये, बायडन लवकरच काँग्रेसमध्ये स्थलांतर सुधारणा कायदा मंजूर करण्याबाबत काम सुरु करतील, असं सांगण्यात आलं आहे. याद्वारे अमेरिकेतील व्यवस्था आधुनिक बनवण्यावर जोर असेल. यानुसार दरवर्षी 95 हजार शरणार्थींना देशात दरवर्षी प्रवेश देण्यासाठी काँग्रेससोबत काम करण्यात येईल.
जो बायडन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर भारताच्या नजरा दोन्ही देशातील संबंध बळकट करण्यावर असतील. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य म्हणून संधी मिळते का पाहावे लागेल. 2006 मध्ये जो बायडन भारत आणि अमेरिका हे देश 2020 या वर्षी सर्वात जवळ असणारे देश असतील, असं म्हटलं होतं.
बायडन सरकार कोणते निर्णय घेण्याची शक्यता?
संबंधित बातम्या :
Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद
US Election 2020 : डेमोक्रॅसी रॉक! बॉलिवूडमधून जो बायडन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!
जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!
(Joe Biden may grant citizenship to over five lakh Indians)