वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघी 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र, जो बायडन यांच्या विजयानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पहिल्यासारखे राहतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे. बायडन यांच्या काळात भारत आणि अमेरिकेतील संबंध यापूर्वीसारखे राहतील का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.जम्मू काश्मीर, चीन प्रश्न, H-1 व्हिसा आदी प्रश्नांवरुन भारत आणि अमेरिकेमधील संबंधावर परिणाम होण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. (Joe Biden polices can change the relations of India US)
भारत सुरुवातीपासून काश्मीर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याची भूमिका घेत आला आहे. भारताने याप्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य केलेली नाही. मात्र, जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी यापूर्वी सार्वजनिकपणे काश्मीरच्या लोकांसाठी भारत सरकारने काम करण्याचा आग्रह धरलेला होता.
काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन जो बायडन यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते. “आपल्या मतांशी मतभेद असणाऱ्यांना रोखणे, शांततेत होणारी आंदोलन थांबवणे, इंटरनेट स्पीड कमी करणे, या गोष्टी लोकशाहीला कमजोर करतात, असं बायडन म्हणाले होते.
“आम्हाला काश्मिरी जनतेला सांगायला हवं की ते या जगात एकटे नाहीत”, असं वक्तव्य कमला हॅरिस यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये केले होते. त्यावेळी त्या डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रायमरी उमेदवार होत्या.
जम्मू काश्मीर प्रश्नाप्रमाणेच चीनच्या प्रश्नावर जो बायडन नरमाईची भूमिका घेऊ शकतात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेतही बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, जो बायडन यांनी निर्णय बदलल्यास भारतासाठी ते अडचणीचे ठरेल.
जो बायडन यांनी H1B व्हिसा संदर्भातील डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय बदलण्याचं आश्वासन दिले होते. मात्र, अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्या भारतीयांना या संदर्भातील निर्णयाची वाट पाहावी लागू शकते. अमेरिकेला कुशल कामगारांची गरज आहे आणि भारतामध्ये सर्वाधिक कुशल कामगार उपलब्ध आहेत.
जो बायडन यांनी कोरोनामुळं होणाऱ्या आर्थिक नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे H1B व्हिसाला ते प्राधान्य देतील का याबद्दल शंका आहे. जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे, त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले राहतील याची अपेक्षा करता येईल.
संबंधित बातम्या :
जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!
ट्रम्प समर्थकांनो झालं गेलं विसरुन जा, एकमेकांना नवी संधी देऊयात: जो बायडन
(Joe Biden polices can change the relations of India US)