वॉश्गिंटन : संपूर्ण देशात दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनीही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउन्टवरुन ट्विट करत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Joe Biden wishes happy Diwali to Indian peoples)
“भारत देशातील करोडो नागरिक प्रकाशाचा उत्सव साजरा करत आहेत. मी आणि माझी पत्नी आपणा सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो.” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, त्यांनी दिवाळीनंतरचं वर्ष आशादायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी कामना करत शेवटी हिंदीमध्ये साल मुबारक म्हणत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
To the millions of Hindus, Jains, Sikhs, and Buddhists celebrating the Festival of Lights, @DrBiden and I send our best wishes for a #HappyDiwali. May your new year be filled with hope, happiness, and prosperity. Sal Mubarak.
— Joe Biden (@JoeBiden) November 14, 2020
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना अमेरिकी जनतेने भरभरुन मतदान केले. या निवडणुकीत जो बायडेन यांनी बहुमताचा आकडा पार करत 290 प्रतिनिधी व्होट्स मिळवले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 232 प्रतिनिधी व्होट्स मिळाले. बायडेन यांच्या या यशामागे अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय मतदारांचा मोठा वाटा असल्याचे निवडणूक विशेषज्ञांकडून सांगितले जाते. या कारणामुळेही जो बायडेन यांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांना वेगळे महत्त्व आहे.
दरम्यान, कोरोनाचे सावट असताना देशात दीपावली उत्सव साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचे पालन करत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी प्रदूषणुक्त आणि कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या :
ग्राहकांची ‘दिवाळी’; काजू-बदामचे दर घसरल्याने सुकामेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी!
मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील
शिर्डीतील साई मंदिरात सोमवारपासून 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय; पण ऑनलाईन बुकिंग सक्तीची!
(Joe Biden wishes happy Diwali to Indian peoples)