कल्याण : पुरोगामी महाराष्ट्रात एक लाजीरवाणी घटना कल्याणमध्ये (Minor Killed Father And Grand Mother Due To Superstition) समोर आली आहे. वडील आणि आजीच्या शरीरातून भूतबाधा उतरण्यासाठी अल्पवयीन मुलाने आपल्या चुलत्याच्या मदतीने वडील आणि आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर या कारस्थानामागे असलेल्या मांत्रिक आणि सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Minor Killed Father And Grand Mother Due To Superstition).
कल्याण मधील अटाळीमध्ये अघोरी विद्येमुळे मुलानेच वडील आणि आजीचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुहेरी नरबळीमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
अंगात भूत असल्याच्या संशयातून दिवसभर दांडक्याने बदडून वडील आणि आजीचीा बळी घेतला. वडील पंढरीनाथ तरे (वय 50) आणि आजी चंदूबाई तरे (वय 76) यांचा अघोरी विद्येने जीव घेतला आहे.धक्कादायक म्हणजे आई समोरच या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांच्या मदतीने वडील आणि आजीची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणजवळच्या आंबिवली आटाळी परिसरात राहणारे पंढरीनाथ तरे आणि त्यांची 76 वर्षीय आई चंद्राबाई तरे या दोघांना पंढरीनाथचा अल्पवयीन मुलगा आणि चुलत बहीण कविता, भाऊ विनायक शनिवारी दुपारी तीन वाजता घराच्या एका कोपऱ्यात घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी या दोघांच्या अंगाला हळद फासली. त्यानंतर दोघांना दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली (Minor Killed Father And Grand Mother Due To Superstition).
गावातील एक मांत्रिक सुरेंद्र पाटील याने या कुटुंबाला सांगितलं होते की, कविताच्या अंगात दैवी शक्ती आहे. पंढरीनाथ आणि चंद्राबाई यांच्या अंगात भूत आहे. भूत उतरण्यासाठी हळद लावून त्यांना मारहाण करावी लागेल. या प्रकारचा अघोरी उपाय या मांत्रिकाने या कुटुंबाला सुचवला.
मांत्रिकाचा सल्ला ऐकून मुलगा, पुतण्या, पुतणी यांनी मिळून आजी आणि वडिलांना मारहाण सुरु केली. या मारहाणीत पंढरीनाथ आणि चंद्राबाई यांचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरे यांचे नातेवाईक हैराण झाले आहेत.
मुलगा आणि मांत्रिकासह चार जणांना अटक
या घटनेमुळे आंबिवलीआटाळी परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिक सुरेंद्र पाटील, पंढरीनाथ यांचा अल्पवयीन मुलगा, चुलत बहीण कविता तरे, चुलत भाऊ विनायक तरे या चौघांना अटक केली आहे. या अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या अघोरी हत्याकांडात आणखीन कोणाचा समावेश आहे याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
चाकणजवळ 17 वर्षीय तरुणीची हत्या, झुडपात विवस्त्र मृतदेह आढळला, अत्याचाराचा संशयhttps://t.co/UAqEANBpKq
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 25, 2020
Minor Killed Father And Grand Mother Due To Superstition
संबंधित बातम्या :