जुन्नरवरुन आणलेले बैल कल्याणमध्ये सापडले, कारवाईनंतर पोलिसांनी…

| Updated on: May 30, 2023 | 8:22 AM

कल्याण बाजारपेठ पोलिसांनी नाकाबंदी करून १३ बैलाची सुटका करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जुन्नरवरून बैलांची कत्तल करण्यासाठी आणल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

जुन्नरवरुन आणलेले बैल कल्याणमध्ये सापडले, कारवाईनंतर पोलिसांनी...
kalyan crime news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याण : बैलांची कत्तल (Slaughter of bulls) व त्यांची खरेदीविक्री करण्यासाठी जुन्नरमधून (junner) एका ट्रकमध्ये १३ बैलाची तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आलेला संशयास्पद ट्रक थांबवला. त्यामध्ये त्यांना १३ बैल असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर तस्करीसाठी बैल आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी (kalyan police) ट्रकसोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची नाव साजिद चौधरी व रेहान कुरेशी अशी आहेत. त्या दोघांची अजून चौकशी होणार असून आणखी काही जणांची नावं उजेडात येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय झालं

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचा हद्दीतील आग्रारोडमार्गे पडघा, तळवली या ठिकाणी एका ट्रकमधून काही बैलांना कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बाजारपेठचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांच्या पथकातील पोलीस हवालदार साळवी, प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, पोलीस नाईक चिंतामण कातकडे, रामदास फड यांनी साफळा रचत नाकाबंदी करतएक ताडपत्रीने गुंडाळलेला ट्रक पोलीस पथकाने थांबून ट्रक चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये १३ बैल पथकाला मिळून आले. याप्रकरणी साजिद व रेहान यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील बैल व ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांच्या माहिती नुसार सदरची जनावरे ही जुन्नरवरून आणण्यात आली असून हे कोणास विकण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करीत आहे. मात्र सध्या सदर बैल यांना बापगाव येथील गौशाळा येथे सुरक्षितेच्या दृष्टीने ठेवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरक्षक घोलप यांनी दिली.

कल्याणमध्ये बैलांची विक्री कोणाला होणार होती याची सुध्दा चौकशी पोलिस करीत आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार कोण आहे ? त्याला सुध्दा पोलिस ताब्यात घेणार आहेत.