भटक्या कुत्र्याने केला हत्येचा उलगडा, चार तासात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

| Updated on: Oct 12, 2020 | 8:10 PM

कल्याणमध्ये एका भटक्या कुत्र्यामुळे एका हत्येचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी चार तासात हत्या करणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

भटक्या कुत्र्याने केला हत्येचा उलगडा, चार तासात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक
Follow us on

कल्याण : कल्याणमध्ये एका भटक्या कुत्र्यामुळे एका हत्येचा उलगडा झाला आहे (Street Dog Solve Murder Case). पोलिसांनी चार तासात हत्या करणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मुकेश पोरेड्डीवार आहे. त्याच्या मित्रनेच दारुच्या नेशत त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे कॅन्टीनच्या सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी जमीनीता गाडला होता (Street Dog Solve Murder Case).

कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी एक कुत्रा सतत जमीन उकरत असताना काही मजूरांनी पाहिले. मजूर हैराण होते. कुत्रा त्याठिकाणी जमिनीची माती का उकरत आहे. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता जमिनीत काही तरी गाडले असल्याची बाब समोर आली. इतकेच नाही तर प्रचंड दुर्गंधी त्याठिकाणी सुटली होती. मजुकरांनी त्याठिकाणी एका व्यक्तिचा मृतदेह पुरला असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बानकर यांनी पोलीस पथक तयार केले. पोलिसांनी काही तासातच मृतदेह कोणाचा आहे. त्याला कोणी ठार करुन मातीत गाडले आहे. याचा शोध घेतला. चार तासात मृतदेहाची आणि मारेकऱ्याची ओळख पटली (Street Dog Solve Murder Case).

मृत हा सदर ठिकाणी बांधकामाला पाणी मारण्याचे काम करत होता. त्याचे नाव मुकेश पोरेड्डीवार असे आहे. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. एवढच नाही त्याचासोबत राहणारा बबलू खान देखील गायब होता. मुकेशची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी बबलू उर्फ गुलामअलीचा शोध सुरु केला आहे. मुकेश हा मूळचा चंद्रपूर येथील राहणार आहे.

मुकेश आणि त्याचा सहकारी कामगार मित्र बबलू गुलाम अली खान एकाच खोलीत राहत होते. जेवणानंतर दारुच्या नशेत या दोघांच्यामध्ये गुरुवारी रात्री कडक्याचे भांडण झाले. या भांडणात गुलाम अली याने आपला मित्र अकिल खान याच्या मदतीने मुकेशला लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन ठार मारले. त्याच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडला आणि पळ काढला. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका भटक्या कुत्र्याने या खुनाचा उलगडा केला ही बाब महत्वाची ठरली आहे.

Street Dog Solve Murder Case

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात नग्न चोरट्याने पोलीस स्टेशनसमोरील 7 दुकानं फोडली, हजारोंचा ऐवज लंपास

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक