नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील भाजप आमदार इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे काँग्रेस नेते कमलनाथ यांना राहुल गांधी यांनी मंगळवारी जाहीरपणे फटकारले. कमलनाथजी माझ्या पक्षाचे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा मला वैयक्तिकरित्या बिलकूल आवडलेली नाही. मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. (Rahul Gandhi condemned Kamal Nath statement about Imarti Devi)
मात्र, एरवीदेखील आपल्या देशात महिलांना देण्यात येणाऱ्या एकंदरीत वागणुकीत खूपच सुधारणा होण्याची गरज आहे. मग ती कायदा-सुव्यवस्था असो किंवा त्यांचा आदर करणे असो. आपल्या देशातील महिलांनी उद्योग, राजकारण आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. त्या आपल्या देशाचा अभिमान आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
#WATCH Kamal Nath ji is from my party but personally, I don’t like the type of language that he used…I don’t appreciate it, regardless of who he is. It is unfortunate: Congress leader Rahul Gandhi on the former Madhya Pradesh CM’s “item” remark pic.twitter.com/VT149EjHu0
— ANI (@ANI) October 20, 2020
तत्पूर्वी कमलनाथ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. माझे व्यक्तव्य कुणाला आक्षेपार्ह वाटले असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले. मात्र, राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात. त्यामुळे मी आइटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही. सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आइटम आहे’, असा केल्याचं स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिलं होतं.
संबंधित बातम्या:
‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल
इमरती देवींचं नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ
(Rahul Gandhi condemned Kamal Nath statement about Imarti Devi)