मुंबई : ‘पंगा क्वीन’ कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. सतत सतत काहीना काही ट्विट करून ती नव्या वादांना निमंत्रण देते आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने ट्विट करत पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्र सोडले आहे. मुंबई स्थित आपल्या बंगल्याचे फोटो पोस्ट करत तिने राज्य सरकार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.(Kangana Ranaut Criticized Sanjay raut and Maharashtra state government on dussehra occasion)
सगळ्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत तिने तिच्या बंगल्याचा आणि हनुमानाच्या एका मूर्तीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले की, ‘माझी तुटलेली स्वप्न, संजय राऊत तुमच्या समोर हसतायत. पप्पू सेना माझे घर तोडू शकते, माझी इच्छाशक्ती नाही. बंगला क्रमांक 5 वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करत आहे.’
#HappyDussehra असे म्हणत तिने सगळ्या चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना तिने पुन्हा एकदा नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. ‘तुम्ही स्वप्न मोडलेत, इच्छाशक्ती नाही’, असे म्हणत पुन्हा खोचक टीका तिने केली आहे. यावेळेस तिने थेट संजय राऊतांचे नाव घेतले आहे. एकीकडे कंगनाचे चाहते तिला समर्थन देत आहेत, तर दुसरीकडे या ट्विटमुळे तिच्यावर जोरदार टीका देखील होत आहे. (Kangana Ranaut Criticized Sanjay raut and Maharashtra state government on dussehra occasion)
My broken dream smiling in your face Sanjay Raut, Pappu sena could break my house but not my spirit, Banglow number 5 is celebrating the triumph of good over evil today #HappyDussehra pic.twitter.com/2i4OnxiPeS
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 25, 2020
शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल कंगनावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दलही कंगना आणि रंगोलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंगना आणि तिच्या बहिणीला पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. यावर ट्विट करत, कंगनाने महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.
मुंबई पोलिसांनी समन्स पाठ्वाल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्विटरवरून राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. ‘पेंग्विन सेना…महाराष्ट्राच्या पप्पूप्रोंना क-क-क-कंगनाची खूप आठवण येतेय. काही हरकत नाही, मी लवकरच येते’, अशा आशयाचे खोचक ट्विट तिने केले आहे.कंगनाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी कंगनाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. या आधीच कंगना तिच्या ट्विटमुळे वादात अडकल्यानंतरही तिची ही अविरत ‘टीवटीव’ सुरूच आहे.(Kangana Ranaut Criticized Sanjay raut and Maharashtra state government on dussehra occasion)
Obsessed penguin Sena … Pappupro of Maharashtra, bahut yaad aati hai k-k-k-k-k-Kangana, koi baat nahin jaldi aa jaungi …. https://t.co/nwLyoq1J2i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020
कंगनासह तिची बहिण रंगोली चंडेलच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Kangana Ranaut Criticized Sanjay raut and Maharashtra state government on dussehra occasion)
संबंधित बातम्या :
Kangana Ranaut | ‘कोणीतरी सरकारी पुरस्कार परत करणार होतं’, स्वरा भास्करचा कंगनाला टोला!
Kangana Ranaut | ‘तेजस’साठी कंगनाची ‘धाकड’ तयारी सुरू, सोशल मीडियावर वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर!