मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील कंपूशाहीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. “अभिनेत्री कंगना रनौत हिची कारकीर्द कंपूशाहीमुळे उदयास आली आहे, असा आरोप अभिनेत्री नगमा यांनी केला. त्यानंतर कंगनाच्या वतीने तिच्या टीमने नगमा यांच्या चारही आरोपांना उत्तरं दिल्याने सोशल मीडियावर दोघींच्या चाहत्यांचीही जुगलबंदी रंगली आहे. (Kangana Ranaut Slams Nagma Clarifies Why Hiring Rangoli Isn’t Nepotism)
नगमा यांनी व्हायरल मीमचा कोलाज पोस्ट करुन कंगना रनौतचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित असल्याचे आरोप केले होते. “कंगनाने बॉलिवूडमधील आपली पकड घट्ट करण्यासाठी आदित्य पांचोली, हृतिक रोशन आणि महेश भट्ट यांचा वापर केला” असा दावा नगमा यांनी केला.
कंगनाने तिची बहीण रंगोलीला मॅनेजर म्हणून कामावर घेणं ही सुद्धा घराणेशाही असल्याचा आरोप नगमा यांनी केला. तर अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे निधन होण्यापूर्वी कंगनाने त्याला कधीच मदत केली नाही, मात्र तिचे ज्यांच्याशी वाद आहेत, त्यांच्याशी अचानक भांडू लागली, अशी टीकाही नगमा यांनी मीममधून केली आहे.
नगमा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूड आणि मराठी सिनेमातही काम केले आहे. सुहाग, बागी, लाल बादशाह, कुवारा अशा काही हिंदी सिनेमात त्या झळकल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. गेल्या दहा-बारा वर्षात त्यांचे मोठ्या पडद्यावर दर्शन झालेले नाही.
#Kangnas nepotism pic.twitter.com/3zsRaUSwQ3
— Nagma (@nagma_morarji) July 22, 2020
कंगनाच्या टीमने नगमा यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहेत. “आदित्य पांचोली हा कंगनाचा बॉयफ्रेंड नव्हता, हे तिने आधीच अनेकदा स्पष्ट केले आहे. त्याने कंगनाचा मेंटर होण्याचे वचन दिले होते, मात्र तो तिचा छळ करु लागला. जेव्हा जेव्हा ती ऑडिशन्स किंवा फिल्म शूटसाठी जात असे, तेव्हा तो तिला मारहाण करायचा” असा दावा टीम कंगनाने ट्विटरवरुन केला आहे.
हेही वाचा : कंगना पोलखोल करण्याची शक्यता, मुंबई पोलीस चौकशीला बोलावण्याच्या तयारीत
“आदित्य पांचोलीने तिची अनुराग बसूशी ओळख करुन दिली नाही. बसू त्याला ओळखतही नाहीत, हे त्यांनीही बऱ्याच वेळा स्पष्ट केले आहे.” असेही पुढे कंगनातर्फे तिच्या टीमने म्हटले आहे.
“कंगनाने गँगस्टरसाठी ऑडिशन दिले, तिथे कंपूशाही नाही. काईट सिनेमात तिच्या भूमिकेची लांबी कमी केल्याने कंगनाची कारकीर्द बिघडली, त्यामुळे तिची इच्छा नसतानाही तिला ‘क्रिश’ सिनेमा करण्यासाठी भाग पाडले गेले” असा दावाही तिच्या टीमने केला आहे
“कुठल्याही एजन्सीला कंगनाचे काम घेण्याची इच्छा नव्हती, कारण जिथे लग्नात तुमच्यावर पैसे उडवतात, अशा ठिकाणी ती नाचणार नव्हती आणि फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीही करणार नव्हती. म्हणून तिची बहीण रंगोली यांनी तिच्या चित्रपटाच्या तारखा हाताळण्यास सुरुवात केली. त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हते आणि बिझनेसबाबत अजिबात माहिती नव्हती. पण त्यांनी तेच केले जे कुठलीही बहीण करेल. त्यामुळे असत्य गोष्टी पसरवणे थांबवा” असा इशारा नगमा यांना टीम कंगनाने दिला आहे.
Nagma ji
1) Pancholi wasn’t her BF, she has made it clear many times that initially he promised to mentor but soon turned tormentor, he used to beat her every time she went for auditions or film shoots no he didn’t introduce her to Anurag Basu..contd.. https://t.co/DO9JZMz6na— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 23, 2020
संबंधित बातमी
Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप
(Kangana Ranaut Slams Nagma Clarifies Why Hiring Rangoli Isn’t Nepotism)