बंगळुरु : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून बॉलिवूड आणि प्रेक्षक सावरले नसतानाच आणखी एका उदयोन्मुख अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. टीव्ही अभिनेता सुशील गौडाने कर्नाटकच्या मांड्या येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. (Kannada TV Actor Susheel Gowda committed suicide)
सुशीलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय सुशील गौडा याने स्वतःच्या राहत्या घरातच गळफास घेतला.
गेल्या काही काळापासून तो आपल्या गावी राहत होता. अवघ्या तीन वर्षांपूर्वी तो विवाहबद्ध झाला होता. त्याच्या निधनाने गौडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा : ‘शोले’तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन
सुशील गौडा अभिनयासोबतच फिटनेस ट्रेनर म्हणूनही कार्यरत होता. सुशील कन्नड चित्रपटसृष्टीत स्वत: ला प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. त्याच्या निधनाने कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
सुशीलचे चाहते, सहकलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सुशीलने ‘अंतापुरा’ टीव्ही मालिकेत काम केले होते. तर ‘सलगा’ या आगामी चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता दुनिया विजय यानेही शोक व्यक्त केला आहे.
Kannada actor and fitness trainer Susheel Gowda, 30, allegedly commits suicide at his residence in Karnataka’s Mandya district, say police sources. He acted in upcoming movie ‘Salaga’ which has Duniya Vijay in lead role
— Press Trust of India (@PTI_News) July 8, 2020