Karan Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक लॅबकडून ‘हा’ दावा!

| Updated on: Oct 26, 2020 | 10:52 AM

व्हिडीओमध्ये कोणताही चुकीचा पदार्थ किंवा अमली पदार्थ सापडलेला नसल्याने, या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे.

Karan Johar | ड्रग्ज प्रकरणातून करण जोहरला ‘क्लीन चीट’, फॉरेन्सिक लॅबकडून ‘हा’ दावा!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान करण जोहरच्या घरात मागील वर्षी झालेल्या पार्टीचा व्हिडीओ (Karan Johar Party Video) पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला होता. करण जोहर आणि त्याच्या पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी ड्रग्सचे सेवन केले होते, असे हा व्हिडीओ पाहून म्हटले जात होते. मात्र, आता एनसीबीने या व्हिडीओची पुन्हा तपासणी केली आहे. या तपासानंतर करण जोहरच्या पार्टीत कोणत्याही सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केले नव्हते, असे म्हणत करण जोहरला क्लीन चीट देण्यात आली आहे. (Karan Johar got clean chit in house party video by NCB)

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या या पार्टी व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्हाईट लाईन ट्यूबलाइटचा प्रकाश असू शकतो, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या अहवालानुसार, कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केल्याचे आढळले नाही. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही चुकीचा पदार्थ किंवा अमली पदार्थ सापडलेला नसल्याने, या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली आहे.

ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरचे स्पष्टीकरण

‘त्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. आठवडाभर काम करुन दमल्यानंतर थोडा मोकळा वेळ घालवण्यासाठी ती पार्टी होती. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलते सलते काही घडत असते, तर व्हिडीओ शूट करण्याइतपत मी मूर्ख आहे का?’, ‘ड्रग्जचे सेवन केले असते, तर आम्ही व्हिडीओ शेअर केला तरी असता का?’ असा प्रश्न करण जोहरने उपस्थित केला होता. (Karan Johar got clean chit in house party video by NCB)

विकी कौशलने नेमके त्याच वेळी नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढल्या. खरे तर विकीला डेंग्यू झाला होता, आणि तो तेव्हा कुठे बरा होत होता. तो गरम लिंबूपाणी पित होता. काही जण वाईन पित होते. व्हिडीओ काढण्याच्या पाच मिनिटे आधी माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक-सोशल पार्टी होती. आम्ही गाणी ऐकली, खाल्लं-प्यायलं आणि गप्पा मारल्या, असेही करण म्हणाला होता.

नेमके प्रकरण काय?

अकाली शिरोमणी दलचे आमदार मजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत करण जोहरच्या पार्टीत ड्रग्जचे सेवन होत असल्याचा आरोप केला होता. ‘बॉलिवूडचे गर्विष्ठ तारे नशेची मिजास मिरवताना पाहा’, असे कॅप्शन देत सिरसा यांनी व्हिडिओ शेअर केला होता.

करण जोहरच्या या पार्टीत अभिनेत्री दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, झोया अख्तर याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अर्जून कपूर, वरुण धवन, विकी कौशल, शाहिद कपूर, अयान मुखर्जीचा समावेश होता. पार्टी व्हिडीओतील कलाकारांच्या एक्सप्रेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

(Karan Johar got clean chit in house party video by NCB)

संबंधित बातम्या : 

पांढऱ्या केसांमुळे करण जोहरची थट्टा, वाढदिनी नवा लूक प्रेक्षकांसमोर

कमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा खळबळजनक दावा