बंगळुरु : कर्नाटक भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक (B. Sriramulu Daughters Wedding) सरकारमधील आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु हे सध्या त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यामुळे चर्चेत आहेत. कारण, ते विवाह सोहळ्यावरील खर्चाबाबत इतिसाह रचण्याच्या तयारीत आहेत. बी. श्रीरामुलु यांची मुलगी रक्षिताचा येत्या 5 मार्चला विवाह आहे. या विवाह सोहळ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या विवाह सोहळ्यावर तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची माहिती आहे. याबाबतीत बी. श्रीरामुलु हे खाण माफिया जी. जनार्दन रेड्डी यांनाही मागे सोडणार आहे.
दशकातील सर्वात मोठा विवाह सोहळा
आरोग्य मंत्री यांची मुलगी रक्षिताचा हैद्राबादचे व्यावसायिक (B. Sriramulu Daughters Wedding) रवी कुमार यांच्याशी विवाह होणार आहे. येत्या 5 मार्चला होणारा हा विवाह सोहळा तब्बल नऊ दिवस चालणार आहे. हा विवाह सोहळा दशकातील सर्वात मोठा सोहळा असणार आहे, अशी माहिती आहे. यापूर्वी 2016 मध्ये जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणीच्या लग्नावर अमाप पैसा खर्च केला होता. मात्र, आता हा रेकॉर्ड बी. श्रीरामुलु तोडणार आहेत.
इतक्या भव्य विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यासाठी जनार्दन रेड्डी मित्र श्रीरामुलु यांची मदत करत आहेत. मात्र, या विवाह सोहळ्यावर होणाऱ्या खर्चाबाबत कोणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. तरी सूत्रांनुसार, या लग्नावर जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नापेक्षा जास्त खर्च होणार असल्याची माहिती आहे. जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
एक लाख पाहुण्यांना आमंत्रण
रक्षिताच्या लग्नासाठी विशिष्ट प्रकराचे 1 लाख कार्ड बनवण्यात आले आहेत. या निमंत्रणात केशर, वेलची, कुंकू, हळद आणि अक्षता ठेवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही शाही विवाह सोहळ्याचं आमंत्रण
It was an honour to meet our beloved PM Shri. @narendramodi ji. Requested him to bless my daughter on her marriage.
ಇಂದು ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಪ್ರಧಾನಿ ಶ್ರೀ @narendramodi ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿ ನನ್ನ ಮಗಳ ಮದುವೆಗೆ ಆಹ್ವಾನಿಸಿದೆ. pic.twitter.com/pH3GxCQRsC— B Sriramulu (@sriramulubjp) February 10, 2020
श्रीरामुलु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच पक्षाच्या इतर सर्व नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. हा लग्नसमारंभ पॅलेस मैदानात होणार आहे. हे मैदान जवळपास 40 एकरात परसलेलं आहे. यापैकी 27 एकरमध्ये लग्न होणार आहे. तर, 15 एकर जागा ही पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.
तीन महिन्यांपासून तयारी सुरु
गेल्या तीन महिन्यांपासून मजूर या लग्नसमारंभासाठी भव्य सेट उभारण्याचं काम करत आहेत. हा सेट हम्पी वीरुपक्ष मंदिरसह इतर अनेक मंदिरांच्या थीमवर तयार करण्यात आला आहे. हा सेट तब्बल 4 एकरमध्ये पसरला आहे.
5 मार्चला जिथे लग्न होणार आहे, तिथे मांड्या येथील मेलुकोटे मंदिराच्या थीमवर सेट साकारण्यात आला आहे. 200 लोक फक्त फुलांची सजावट करण्यासाठी आहेत. बॉलिवूडमधील सर्व आर्ट डायरेक्टर्सला बोलावण्यात आलं आहे. एक आणखी सेट बेल्लारीमध्ये तयार करण्यात येत आहे. जिथे लग्नानंतर रिसेप्शन होईल.
मेकअपसाठी दीपिका पादूकोणचा मेकअप आर्टिस्ट, तर मुकेश अंबानींचा व्हिडीओग्राफार
श्रीरामुलु यांनी त्यांच्या मुलीसाठी बॉलिवूड स्टार दीपिका पादूकोणच्या मेकअप आर्टिस्टला बोलवलं आहे. शिवाय, फोटो आणि व्हिडीओग्राफीसाठी जयरामन पिल्लई आणि दिलीप यांच्या टीमला बोलवण्यात आलं आहे. या टीमने मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या शाही लग्नात फोटो काढले होते. रक्षिताच्या लग्नाचे कपडे सानिया सरदारियाने डिझाईन केले आहेत.
एकावेळी सात हजार पाहुणे जेवतील इतका मोठा डायनिंग हॉल
वऱ्हाडी आणि पाहुण्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तर एक हजार आचारी पाहुण्यांसाठी उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध पदार्थ बनवतील. या लग्नसोहळ्यासाठी एक भव्य डायनिंग हॉल तयार करण्यात आला आहे, जिथे एकावेळी तब्बल सात हजार पाहुणे सोबत जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.
बी. श्रीरामुलु कोण आहेत?
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दलित चेहरा बी. श्रीरामुलु (वय 46) हे पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. जी. जनार्दन रेड्डी आणि बी श्रीरामुलु यांच्या जोडीने कर्नाटकात अशक्य वाटत असलेल्या भाजप सरकार शक्य करुन दाखवलं. वाल्मीकि समाजाचे नेते श्रीरामुलु यांनी मित्र जनार्दन (B. Sriramulu Daughters Wedding) रेड्डींच्या साथीने कांग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडलं आणि बीएस येदियुरप्पा यांचं सरकार स्थापन झालं.