मुंबई : कर्नाटकच्या हुबळी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे (Hubali Shooting Case Main Culprit). मुंबईतील अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट एटीएसने ही कारवाई केली. एटीएसची जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली (Hubali Shooting Case Main Culprit).
कर्नाटकात 6 ऑगस्ट 2020 रोजी हुबळी येथे इरफान हंचनाळ यांच्यावर तीन जणांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात इकबाल नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत हुबळी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात कर्नाटक पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली आहे.
मात्र, गोळीबार करणारा मुख्य आरोपी गोलू उर्फ अंकुर सिंह उर्फ अनुप सिंह हा फरार होता. हा फरार आरोपी गोलू मुंबईतील अंधेरी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती एटीएसच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी आपल्या पथकासह सापळा रचत शूटर गोलूला अखेर अटक केली. गोलू याला अटक करण्यात आल्याबाबतची माहिती हुबळी पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार हुबळी पोलीस पुढील कारवाई करतील.
एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, लुधियाना हादरलंhttps://t.co/3IqUbhD3VV#CrimeNews #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
Hubali Shooting Case Main Culprit
संबंधित बातम्या :
लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु
एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, लुधियाना हादरलं
लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु