रात्री बाल्कनीत ठेवा ‘या’ 3 गोष्टी, पक्षांचा किलबिलाट ऐकून मन होईल खूप रिलॅक्स

| Updated on: Jan 14, 2025 | 6:22 PM

तुमच्या बाल्कनीत सुद्धा पक्षांचा किलबिलाट पाहायचा असेल तर या तीन वस्तू तुम्ही बाल्कनीत ठेवा. अशाने पक्षांना त्याचे आहार देखील मिळेल. त्यामुळे सकाळी तुम्ही हे तुमच्या बाल्कनीत वेगवेगळे पक्षी दिसल्यास तुमचं मन अगदी प्रसन्न तर होईल.

रात्री बाल्कनीत ठेवा या 3 गोष्टी, पक्षांचा किलबिलाट ऐकून मन होईल खूप रिलॅक्स
Follow us on

शहरी जीवन हे धावपळीचे जीवन असल्याने तसेच शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्याला पक्षांचा किलबिलाट ऐकू येत नाही. मात्र तुम्ही जेव्हा गावी जाता किंवा तुम्ही पाहिलं असेलच की खेड्यापाड्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, त्यांच्या या किलबिलाटाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते. पण शहरांच्या धावपळीच्या जीवनात हा आवाज कुठेतरी नाहीसा होतो.

विशेषतः नोकरीच्या शोधात गावातून शहरात येणाऱ्यांना लोकांना त्यांच्या अंगणात येणाऱ्या पक्षांची किलबिलाट आठवत असते. मात्र शहर भागात असे दृश्य दिसणे जरा कठीणच आहे. आता शहरातील मोठं मोठ्या बिल्डिंगच्या आवारात पक्षी कवचितच पाहायला मिळतात. अशातच काही बिल्डिंगमधील घराच्या बाहेर मोठी बाल्कनी असते. तुमच्या बाल्कनीत देखील पुरेशी जागा असल्यास तुम्ही पक्षांसाठी काही त्यांना लागणारे व घरात असणारे खाद्य ठेवायला सुरुवात केली तर पक्षी रोज तुमच्या बाल्कनीत येतील. सकाळी तुम्ही हे दृश्य पाहिल्यास तुमचं मन अगदी प्रसन्न तर होईल आणि पक्ष्यांना खाऊ घालणे हे केवळ उदात्त कार्य नाही, तर ते मनाला खूप आराम देणारे आहे.

२ – बाल्कनीच्या भिंतीवर ठेवा बाजरी

बाजरी बाल्कनीच्या भिंतीवर ठेवा. रोज रात्री बाल्कनीच्या भिंतीवर बाजरी ठेवावी. यामुळे सकाळच्या वेळी तुमच्या बाल्कनीत पक्षी यायला सुरुवात होईल. मूठभर बाजरी सुद्धा पुरेशी होत असल्याने ती दीर्घकाळ टिकू शकते. अशाने तुमची सकाळ खूप आनंदात जाईल.

हे सुद्धा वाचा

२- भाजलेले चणे ठेवू शकता

भाजलेले चणे कबुतरं खूप आवडीने खातात, भाजलेले चणे बाल्कनीच्या भिंतीवर ठेवले तर कबुतर रोज तुमच्या बाल्कनीत नियमित येतील. पक्षी पाहून तुमचा दिवस चांगला जाईल.

3- पोळीचे बारीक तुकडे करून ठेवा

रात्री एखादी पोळी शिल्लक असेल तर तुम्ही रात्री बाल्कनीत बारीक करून ठेवू शकता. असे केल्याने पक्षी तुमच्या बाल्कनीत येत राहतील. कबुतर आणि इतर पक्षी बारीक केलेली पोळी खूप आवडीने चावतात. बाल्कनीच्या भिंतीत किंवा कोपऱ्यात कुठेतरी मातीचे भांडे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात रोज पाणी भरावे. जेणेकरून तहानलेल्या पक्ष्यांनाही पाणी पिता येईल.

तुम्ही तुमच्या बाल्कनीत या तीन वस्तू रोज ठेवल्यास पक्षांची किलबिलाट  ऐकता येईल आणि त्यांना पाहून मन अगदी प्रफुल्लीत होईल…